रात्री एक वाजता विहरीत उतरुन विस फुट खोलपाण्यातील मृतदेह काढला बाहेर🏊🏻‍♂️....

*रात्री एक वाजता विहरीत उतरुन विस फुट खोलपाण्यातील मृतदेह काढला बाहेर*🏊🏻‍♂️...........
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.

               ▶️ 7 जुलै 2022 रोजीची मंगरूळपीर शहरालगतची घटना.... ▶️ बार्शी टाकळी तालुक्यांतील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीर येथील जवानांची जिगरबाजी🏊🏻‍♂️🏊🏻‍♂️... ▶️ 
काल रात्री 10:00 वाजता मंगरूळपीर पो.स्टेशन चे ठाणेदार हुड साहेबांनी पथकाच्या जवानांना माहीती देत नविन सोनखास जांबरोड मंगरूळपीर येथील एका शेतातील विहीरीत मृतदेह असल्याची दाट शक्यता आहे या करीता आपण सर्च ऑपरेशनसाठी तात्काळ येण्याचे सांगितले. लगेचच पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना अतुल उमाळे यांनी याबाबतची माहिती दीली आणी सर्च ऑपरेशन करीता रवाना होण्यासाठी सांगितले तेव्हा पथकाचे स्वयंसेवक शाखा प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे,गोपाल जयस्वाल, अजय डाके,अपूर्व चेके, लखन खोडे,सुमित मुंधरे,हे आपल्या शोध व बचाव साहीत्यासह घटनास्थळी रवाना झाले.यावेळी विहीर ही 70 फुट खोल आणी त्यात विस फुट खोल पाणी असल्याने फरम्याचे खालील भागात खचण्याच्या परीस्थिती असलेले दगड माती व अंधार असल्याने बुडातील मृतदेह शोधुन बाहेर काढणे अतिशय अवघड होते यावेळी बार्शी टाकळी तालुक्यातील जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी आपल्या सहका-यांना फोनवरून मार्गदर्शन देत यावेळी विहीरीत अतुल उमाळे,गोपाल गीरे, लखन खोडे हे विहरीत उतरले आणी अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन राबवुन शेवटी दोन तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री 11:45 वाजता मृतदेह शोधुन बाहेर काढला व घटनास्थळी उपस्थित पोलिसांच्या ताब्यात दिला. सदर मृतदेह हा प्रमोदसिंग ठाकुर वय अंदाजे (45) वर्ष रा.मंगरूळपीर यांचा असल्याचे समजले. यावेळी मंगरूळपीर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनिल हुड साहेब, पिएसआय, आघाव साहेब,पो.काॅ. सुमित चव्हाण,अमोल वानखडे,खुशाल गाडे, हे हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे