धाबा येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे धरणे आंदोलन...!
धाबा येथील मंडळ अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे धरणे आंदोलन...!
आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी
धाबा या गावातील मंडळ अधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालय येथे सामान्य शेतकर्यांचे होत असलेले शोषणा विरोधात व अधिकाऱ्यांची सतत कार्यालयात अनुपस्थिती ,ओला दुष्काळ जाहीर होऊन देखील सर्व्हे न करणे, पिकांची पाहणी न करणे , तसेच इतर समस्या - विहीर खचने इ. यांची दखल न घेणे व टाळाटाळ करने हे धाबा येथे सुरू होते. तेथील स्थानिक शेताऱ्यांनी फोन करून त्यांचे होत असलेले शोषण यांची कल्पना देऊन मदत मागितली. सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळी तालुका यांच्या वतीने व अनुराधा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी कार्यालय धाबा येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
उपस्थितांमध्ये दादाराव सुरडकर (तालुकाध्यक्ष ), अमोल जामणीक (युवक आघाडी तालुकाध्यक्ष) , कृष्ण दहात्रे ( तालुका संघटक), प्रदीप राठोड, डॉक्टर शिवा राठोड , सृष्टि अनुराधा ठाकरे, अनिल दहात्रे ,संजय दहात्रे, भूषण खंडारे, श्रीकृष्ण देवकुंभी ,गणेश इंगळे, भूषण सरकटे, देवयानी दहात्रे, यमुनाबाई चव्हाण, तसेच इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते
Comments
Post a Comment