भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेचे भूमिपूजन ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण.....
*भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण*
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम भेंडीमहाल येथे जल जीवन मिशन योजनेच्या भुमिपूजन सोहळा सोमवारी संपन्न झाला.भेंडीमहाल. येथे जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत भेंडीमहाला गावातील पाणी पुरवठा योजने साठी ४७ लक्ष रुपये मंजूर झाले असून यामध्ये पिण्याच्या पाण्याची एक नवीन टाकी बांधकाम क्षमता ४८ हजार लिटर पाण्याची जुनी टाकी दुरुस्ती क्षमता ४० हजार लिटर गावातील अंतर्गत नवीन पाईप लाईन चेंबर दुरुस्ती वॉल बसविणे तसेच पाण्याच्या टाक्या पासून ते पाणी पुरवठा विहीर पर्यंत पाईप लाईन व जल जीवन मिशन योजनेच्या भुमिपूजन सोहळा संपन्न यावेळी जनुना सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य रामसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच भेंडीमहाल ग्रामपंचायत चे सरपंच उमिता संदीप राठोड उपसरपंच दिनेश राठोड ग्रामपंचायत सदस्य देवकाबाई दशरथ राठोड ग्रामपंचायत सदस्य मधुकर घनगांव ग्रामपंचायत सदस्य नितेश जाधव ग्रा.सदस्य सुधाकर चव्हाण ग्रा.सदस्य वैशाली देशमुख ग्रा.सदस्य शितल राठोड,दशरथ राठोड , संदीप राठोड,रोहीदास जाधव ,सहदेव राठोड ,भिमराव राठोड ,महादेव राठोड ,रोहीदास राठोड, प्रदीप राठोड, गणेश राठोड मुकेश पवार तसेच दगड पारवा येथील सामाजिक कार्यकर्ते व कंत्राटदार पप्पू चव्हाण, तसेच जनुना ग्रामपंचायत चे सरपंच सेवा राठोड, ठेकेदार निशांत राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण पवार, शिपाई सुशील पवार यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment