अकोट अकोला महामार्गावरील गोपालखेळ पुलावरून रहदारी सुरू करा वंचित बहुजन आघाडीची मागणी.....
अकोट अकोला महामार्गावरील गोपालखेळ पुलावरून रहदारी सुरू करा.
अकोट अकोला रेल्वे पुन्हा सुरू करा
अकोला प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीग्राम येथील वाहतूक होणाऱ्या पुलाला भेगा पडल्या आहेत त्यामुळे ह्या रोडवरील सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अकोट अकोला रेल्वे तात्काळ चालु करण्यात यावा व पुलाची दुरुस्ती करून अकोला अकोट मार्ग पुर्वी प्रमाणे वाहतूकीसाठी चालू करण्यात यावा तसेच अंदुरा येथील पुलाचेही काम चालू करण्यात यावे या मागण्यांसाठी मा. जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की, इंग्रज कालीन असलेला अकोट अकोला रोडवरील गांधीग्राम येथील पुलाला भेगा पडल्या असुन तो पडण्याच्या अवस्थेत असल्याने प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेतली व हा रस्ता रहदारी करीता पुर्णपणे बंद केल्यामुळे येथील अनपेक्षितपणे घडणारी दुर्घटना टळली. खरोखरच या निर्णयाबद्दल आपले वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने मनापासून आभार. परंतु अकोला अकोट महामार्ग हा प्रचंड वाहतूकीचा व इतर जिल्ह्यासह इतर राज्यांनाही या मार्गावर ये जा करावे लागत असल्याने त्या वाहनांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे सोबतच दिवाळीचा सर्वात मोठा सण आल्याने ग्रामिण भागातील लोक खरेदी साठी अकोला येताना त्यांना त्रास होत आहे त्यामुळे ह्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अकोला ते अकोट व अकोट ते अकोला हि बंद पडलेली रेल्वे तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच गांधीग्राम येथील नदिवरील पुलाची उत्कृष्ट दर्जाची दुरूस्ती करावी अथवा अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोपालखेळ येथील नवीन पुलाला जोडणारा अंदाजे ३ कि. मी. चा रस्ता बांधनी केल्यास सदर पुल वाहतूकीस वापरात येऊ शकते, करीता सदर रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे तसेच निंबा फाटा तेल्हारा येथे जाणाऱ्या मार्गावरील अंदुरा येथील पुलाची सुध्दा हिच अवस्था आहे. सदर नविन पुल निर्मिती करीता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करून निधीही उपलब्ध झालेला आहे. परंतु अद्यापपर्यंत सदर कामाला सुरुवात झाली नसल्याने भविष्यात येथेही गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याने अंदुरा येथील पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी संबंधित यंत्रणेनेला आदेशीत करवे अशीही मागणी वंचितच्या वतीने निवेदनात करण्यात आली. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंदभाऊ इंगळे, विभागीय महासचिव बालमुकुंद भिरड, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जिल्हा महासचिव निलोफर शहा, प्रतिभाताई अवचार, दिनकरराव खंडारे, गजानन गवई, किशोर जामणिक, देवराव राणे, शरद इंगोले, मंगला शिरसाट, विकास सदांशिव, गोपाल कोल्हे, संजय नाईक, पवन बुटे, पराग गवई, सै. सादिक भाई, मोहन तायडे, सुमेध अंभोरे, राजकुमार क्षिरसागर, संजय किर्तक, हरिष रामचवरे, श्रीकृष्ण देवकुणबी, सुरेंद्र तेलगोटे धाया तायडे, मंदाताई वाकोडे, सुरेखा सावदेकर, तेजस्विनी बागडे, सै. करिम उर्फ जानी, धर्मेंद्र दंदी, जनार्दन तायडे, सुरज तायडे, आनंद खंडारे, मधुकर गोपनारायण, देवानंद तायडे, सचेंद्र तिडके, रूपेश जंजाळ, वासिम काजी, सतिश निमकर, तमीज खॉं, सैय्यद रियासत, रत्नपाल डोंगरे, सिध्दार्थ शिरसाट, सुनिल शिरसाठ आरोग्य सभापती न.प. , न.प. नगरसेवक श्रावण रामदास भातखडे,
नईमोद्दीन शेख, इमरान खान, अझहर पठाण, शेख अफरोज,न.प.उपाध्यक्ष सुरेश जामणिक, अनिल धुरंधर, नागेश सुलताने, दिलीप शिरसाट, अमोल शिरसाट, सचिन शिरसाट, अतिश शिरसाट.वंचित बहुजन आघाडीचे जिल्यातील कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment