बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी वृक्षारोपण संपन्न..............
बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी वृक्षारोपण संपन्न..............
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ धाबेकर यांच्या उपस्थितीत बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे आज दिनांक 21-10- 2022 रोजी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी निमाताई अरोरा, बार्शीटाकळी तहसीलदार गजानन हामंद, मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार शिवहरी थोंबे, मुख्याध्यापक गजेंद्र काळे, यांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.
सर्व प्रथम जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनीलभाऊ धाबेकर यांनी जिल्हाधिकारी निमाताई अरोरा यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आदरणीय जिल्हाधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले
दिनांक 15- 10- 2022 रोजी नेहरू युवा केंद्र अकोला अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय उत्सव 2022 मध्ये शाळेमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम ,चित्रकला स्पर्धेमध्ये यश प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धा करता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना होणाऱ्या स्पर्धेमध्ये निश्चितच यश प्राप्त होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले
वृक्षारोपण कार्यक्रमास बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते
Comments
Post a Comment