वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे व उपोषणकर्त्यांच्या मागणीला यश........
वंचित बहुजन आघाडी आकोट शहर उपाध्यक्ष लखन इंगळे व उपोषणकर्त्यांच्या मागणीला यश......
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट: वंचित बहुजन आघाडी आकोट चे उपाध्यक्ष लखन इंगळे यांच्या नेतृत्वात श्री कॉलेनी येथील नागरिकांनी उपोषण केले असता याची दखल संबंधित अधिकारी यांनी तात्काळ घेतली
गोरगरीब व सामान्य लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांच्या नेतृत्वात श्री कॉलेनी येथील दलित मातंग, कोळी,धनगर या समाजावर अन्याय होत होता यांना मागील कित्येक वर्षे पासुन नाली बांधकाम करून न दिल्यामुळे यांच्या घरासमोर मोठया प्रमाणात डबके साचल्यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे अगोदर यांनी उपविभागीय अधिकारी आकोट व मुख्यअधिकारी नगर परिषद आकोट यांना निवेदन दिले होती तरी पन याची दखल कोणीच घेतली नाही पण त्यावर आता परियंत आरोग्य विभाग व बांधकाम विभाग न.प. आकोट हे नागरिकां कडून टॅक्स वसुल करत आहे व यांना चांगल्या सुख सुविधा पुरवत नाही तर मग नगर परिषद यांनी टॅक्स वसुल करू नये यांनी संबंधित अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात कागदोपत्री देखावा करत असुन कोणत्याही प्रकारे कामे न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळीत आहे यांच्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन बरेच वेळा येथील नागरिक नगर परिषद येथे चेकरा मारीत होते व न.प.येथील संबंधित अधिकारी हे नागरिकांना उडवा उडवीचे उत्तरे देत होते याची माहिती येथील नागरिकांनी लखन इंगळे यांना दिली असता नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी संबंधित अधिकारी यांनी 10 दिवसात नागरिकांचे घरा समोरील सांडपान्याचे काम मार्गी लावले नाही तर दि.24.11.2022 रोजी येथील रहिवाशी नागरिक नगर परिषद आकोट येथे उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भिमराव किरडे, नारायण झाबूजी इंगळे हे आमरण उपोषण करतील काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा निवेदन देते वेळी वंचित चे लखन इंगळे व नागरिकांनी दिला होता व उपोषण ला नागरिक बसले असता त्यांच्या मागणीला यश हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या ताकीतीने संविधान दिनी दि.26नोव्हेंबर रोजी आले आहे लखन इंगळे यांनी नागरिकांना न्याय मिळून दिल्यामुळे श्री कॉलेनी येथील प्रतिष्ठित नागरिकांनी लखन इंगळे यांचे व टीम चे उपोषण कर्त्यांचे मोठ्या उत्तसात स्वागत केले आमच्या सोबत असलेले सर्व वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ पदाधिकारी नागरिक पत्रकार महिला आघाडी हे सर्व पाठीशी राहून यश आले सोबत नगर परिषद मुख्यअधिकारी यांचे लेखी मागणी पुर्ण करण्याचे पत्र दिले आहे पुढील ठरवात नाली बांधकाम करण्या संदर्भात विषय घेण्यात येणार सांडपाणी याची वेळोवेळी सफाई करण्यात येणार व नाली बांधकाम करून देण्यात येईल अस्या मागणी चे लेखी पत्र लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट उर्मिला शिवाजी भदे, वर्षा रवींद्र इंगळे, सुरेश भिमराव किरडे, नारायण झाबूजी इंगळे यांच्या नावे दिले व उपोषण न.प.मुख्यअधिकारी यांच्या तर्फे करण अग्रवाल व सोबत कर्मचारी उपस्थित राहून उपोषण कर्त्यांना ओ आर एस पाजून उपोषण सोडून मागे घेण्यात आले व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मंदाताई कोल्हे वरिष्ठ नेत्या वंचित बहुजन महिला आघाडी अर्चन वानखडे उपाध्यक्ष महिला आघाडी मीरा तायडे सुशीला पाखरे कमला तेलगोटे सुनिलभाऊ अंबळकार वरिष्ठ नेते प्रदिपभाऊ वानखडे जिल्हाप्रभारी बुलढाणा वंचित संदीपभाऊ आग्रे माजी तालुका अध्यक्ष भारीप दिवाकरभाऊ गवई वरिष्ठ नेते वंचित बहुजन आघाडी दिनेशभाऊ घोडेस्वार
काशीरामभाऊ साबळे वरिष्ठ नेते सुभासभाऊ तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट रामकृष्णभाऊ मिसाळ वंचित बहुजन आघाडी आकोट पांडुरंगभाऊ दामोदर विनोदभाऊ नांदुरकर ईश्वरभाऊ इंगळे अक्षय तेलगोटे सलीम मिर्जा इम्रान पठाण विशाल आग्रे युवक आघाडी माजी तालुका अध्यक्ष नितीन वाघ नितीन तेलगोटे महिला मुक्ती मोर्च्या अध्यक्ष लक्ष्मीताई गावंडे वंचित महिला तालुका अध्यक्ष सुनीताताई हेरोडे मंगला तेलगोटे जीतूभाऊ तेलगोटे चेंदूभाऊ बोरोडे मयूर जुनगरे प्रशांत नाठे विलास तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे सुगत तेलगोटे सुनील वानखडे दिनेश नुपनारायण वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी यांच्या पाठबळ मुळे या उपोषनाला यश आले.
Comments
Post a Comment