गांधीग्राम येथील पुल बंद ; तोडगा न निघाल्यास दुचाकीसाठी मार्ग सुरू करू.... ∆ वंचित बहुजन आघाडीचा इशारा, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरू...... ∆भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे व प्रदिप वानखडे यांची भेट...

गांधीग्राम येथील पुल बंद ; तोडगा न निघाल्यास दुचाकीसाठी मार्ग सुरू करू....                                  ∆ वंचित बहुजन आघाडीचा इशारा, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पाचव्या दिवशीही आंदोलन सुरू 
∆भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे व प्रदिप वानखडे यांची भेट 

गांधीग्राम - अकोला - अकोट मार्गावरील बंद असलेल्या पूर्णा नदीच्या पुलासाठी गांधीग्राम येथे सर्व पक्षीय संघर्ष समिती व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार ता.१५ पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
                या आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता येथे आज शेकडो ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडी तथा भारिप बहुजन महासंघ, यांनी आंदोलन मंडपाला भेटी दिल्या,
∆आज गांधीग्राम येथे पूर्णा नदीवरील पूल व व अकोट अकोला मार्ग सुरू व्हावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे, यांच्या सह इरफान अली , संदीप आग्रे, नितीन वाघ , चंदू बरोळे , यासह इतर कार्यकर्त्यांनी भेट दिली व जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील तसेच या मागणीचा पाठपुरावा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रशासनाकडे करण्याची यावेळेस जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी उपस्थित धरणे आंदोलनाला पाठपुरावा करणार असे सांगितले
यावेळी मनोहर शेळके, राजेश मंगळे,माजी सरपंच संजय माजरे, आनंद अढाऊ,सुभाष फुरसुले,सुरेंद्र ओईम्बे,अतुल काठोळे, संजय वाघमारे,पुरूषोत्तम नळे,वैभव श्रीनाथ, भगवान आढे, संतोष शिवरकर, माधव कवतकर,परनाटे, शुभम सोनोने, शरद खरात, शरद ठाकरे, निलेश बगाळे, विलास वसू, जयदेव वसू.गजानन एलोने, सुदर्शन किरडे, मंगेश ताडे, प्रशांत खोटरे, राजु वढाळ,विनोद महल्ले,राजु एखे, राजु वडाळ,मनोहर मार्के,संजय भंबेरी, संजय बागलकर,दिवाकर गवई माजी उपाध्यक्ष न पा अकोट,निरंजन दामोदर, पंढरी ओहेकर,नितीन ताथोड ,बाळासाहेब इंगळे, मारोती सपकाळ, बळीराम अवझाड, जानकराव बूट, नितीन वाघ, दिनेश घोडेस्वार नगरसेवक अकोट,
*∆विद्यार्ध्यांची आंदोलन मंडपाला भेट*
महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी यांनी यावेळी आंदोलन मंडपाला भेट दिली व त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या विद्यार्थ्यांना एस टी बसेस सुरू नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....