जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची लोहगड येथे भेट.......
जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांची लोहगड येथे भेट......
बार्शिटाकळी : दि 31/12/2022 रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथे एका वर्ष श्राद्ध कार्यक्रमात जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. अचानक जेवणामध्ये विषबाधा होऊन गावातील 200 ते 250 लोकांना दुखापत झाली, यामध्ये पोटाचे आजार, उलटी मळमळ,संडास लागणे यासारखे लक्षणे दिसून आली एकाच गावातील एवढ्या साऱ्या लोकांना ही बाधा लक्षात आल्यानंतर जेवणामध्ये काहीतरी झाल्याचे निदर्शनास आले. बाधा झालेल्या सर्व रुग्णांची उपचार धाबा येथे सुरू होते यामधील काही नागरिकांना दिलासा मिळाला असून काहींना अजूनही हा त्रास चालू असल्याचे दिसून आले.
रुग्णांची होणारी गैरसोय पाहताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ फाटकर यांनी पी एस सी केंद्र धाबा व लोहगड येथे भेट दिली यावेळी लोहगड येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते यावेळी सोबतच बार्शी टाकळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते रतन आडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, हरीश राम चौरे तालुका संघटक, मिलिंद करवते तालुका प्रसिद्धी प्रमुख, रोहिदास राठोड पंचायत समिती सदस्य, ज्येष्ठ नेते तुळशीराम चव्हाण, गोवा सेठ, श्रीकृष्ण देवकुणबी तालुका महिला महासचिव उज्वला ताई गडलिंग लोहगड येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते सतीश पवार, ताई प्रभाकर धाडसे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई पवार , संजय जाधव , उमेश राठोड , मुरलीधर पवार , प्रभाकर धाडसे , गजानन पवार , करम सिंग राठोड , रोहन पवार , प्रमिला चव्हाण , भागाबाई पवार , भागवती पवार , संदीप चव्हाण यामध्ये काही योगदान देणारे डॉक्टर शर्मा , डॉक्टर देशमुख , डॉक्टर सैय्यद आदी मंडळी उपस्थित होती
Comments
Post a Comment