नवनिर्वाचित सरपंच श्री केवल राठोड यांचा अजनी खुर्द येथील नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते सत्कार.....
नवनिर्वाचित सरपंच श्री केवल राठोड यांचा अजनी खुर्द येथील नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते सत्कार.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी: तालुक्यातील गट ग्रामपंचायत रेडवा, अजनी खुर्द च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीमध्ये रेडवा येथील श्री केवलभाऊ दर्यासींग राठोड हे केवळ एक मताने निवडून आले आहेत. त्या निमीत्ताने अजनी खुर्द येथील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य श्री संदिप चव्हाण, श्री उमेश प्रधान, सौ.वनीता पवार यांनी रेडवा येथे त्यांचे निवासस्थानी जावून त्यांचा, शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला. या प्रसंगी अजनी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचार प्रमुख श्री देविदास कावरे,श्री शरद घोगरे, पंजाबराव राठोड, संतोष चव्हाण, मनोहर पवार, गुलाबराव पवार, गोकुळ जाधव, आकाश राठोड, व रेडवा येथील माजी सरपंच श्रश्री पंजाबराव राठोड,अनिल जाधव,सुनील राठोड, गणपत जाधव, शिवराम राठोड, अनिल राठोड, सुमित राठोड, रंजीत पवार, अजय जाधव, विनोद राठोड, मनोज राठोड, रामेश्वर राठोड यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment