शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुद्दत संपाचा इशारा.....
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा बेमुद्दत संपाचा इशारा.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलांगित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मांगण्या साठी 2 फेब्रवारी पासून बोर्ड व विद्यापीठातील परीक्षा च्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार असून त्यानंतर 16 फेब्रुवारी ला एक दिवसीय संप व मांग्ण्या मान्य न झाल्यास 20 तारखे पासून बेमुदत संप करण्या चा निर्णय सेवक संयुक्तं समिती च्या बैठकीत घेण्यात आले असून असे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लिटर पेड वर अकोला जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्या ना पत्रक देण्यात आले आहे.
सेवा अंतर्गत सुधारित आश्र्वासित प्रगती योजनेचा रद्द करण्यात आलेला शासन निर्णय पूर्णजिवित करून पुर्वावरत लागू करा,सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०,२०,३० वर्षा नंतर च्या लभांची योजना विद्यापीठीय महाविद्यालयीन शिक्षीकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिकशेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देण्यात यावी.२००५ नंतर सेवेत रुजू झाले ल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या साठी या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्तं कुर्ती समिती च्या बैठकीत समिती चे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ आर.बी सिंह यांनी वरील निर्णय घेतला.
बार्शी टाकळी येथील गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वरील पत्रक देण्या साठी राज्य अध्यक्ष राजा भाऊ बडे, सतीश शर्मा हे आले असता यावेळी युनिट प्रमुख दशरथ बबुसिंह जाधव, मुफिज खान, शांताराम जाधव, सुरेश राठोड, पंजाब जाधव,आदी शिक्षेत्तर कर्मचारी हजर होते.
आंदोलनाची दिशा अशी:
२ फेब्रुवारी पासून होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय सर्व परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार.
१४ फेब्रुवारी रोजी भोजन वेळेत निदर्शने
१५ फेब्रुवारीत काळया फिती लावून काम.
१६ फेब्रुवारी ला एक दिवसीय लाक्षणिक संप.
२० फेब्रुवारी पासून बेमुदत संप.
Comments
Post a Comment