धाबा व महान केंद्राचे विद्यार्थी बचाव आणि सुरक्षितता उपक्रम कार्यक्रम संपन्न........
*धाबा व महान केंद्राचे विद्यार्थी बचाव आणि सुरक्षितता उपक्रम कार्यक्रम संपन्न.....*
प्रतिनिधी बार्शीटाकळी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद महाराष्ट्र शासनामार्फत शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता उपक्रम योजना अंमलबजावणी करिता कार्यशाळा घेण्यात येत आहे त्या अंतर्गत बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रत्नसिंग पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महान व धाबा केंद्राची संयुक्त विद्यार्थी सेफ्टी अँड सेक्युरिटी कार्यशाळाची आयोजन तालुक्यातील लोहगड येथील जिल्हा परिषद शाळा येथे 29 मार्च रोजी बुधवारी करण्यात आले होते यावेळी सदर कार्यक्रमाचे निमंत्रक धाबा व महानचे केंद्रप्रमुख विनोद गणपत पिंपळकर हे होते यावेळी महान व धाबा केंद्रातील मुख्याध्यापकांना विद्यार्थी सेक्युरिटी एंड सेफ्टी या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले असून याविषयी मुख्याध्यापकांकडून प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेण्यात आली आहे तसेच व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून याबाबत सविस्तर माहिती मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आली असून सदर माहिती शाळा स्तरावर पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांना सोपविण्यात आली आहे याबाबत वितरित करण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून शाळा स्तरावर जनजागृती होणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना सेफ्टी व सेक्युरिटी विषयी माहिती ची जानवी व्हावी बचाव आणि सुरक्षितता उपकर्म हा शाळांमधील मुलांची बचाव आणि सुरक्षा संबंधी चिंता दूर करण्यासाठी समग्र शिक्षा द्वारे रचलेला एक व्यापक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शाळेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणे हा आहे प्रशिक्षणात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि एनसीईआरटी एससीईआरटी च्या संपूर्ण शाळा बचाव दृष्टिकोन चे प्रमुख विषय समाविष्ट केले आहे ही मार्गदर्शक तत्व सर्व संरक्षक रुपयांची खात्री करून शाळांना मुलांसाठी अनुकूल जागा बनविण्यावर भर देतात हा कार्यक्रम शिकण्यासाठी संरक्षित आणि सुरक्षित वातावरण निर्माण करेल याबाबत संपूर्ण माहिती व्हिडिओ चित्रीकरण द्वारा देण्यात आली शाळांना सुरक्षितता आणि बचाव समित्या नेमण्यास प्रोत्साहन मिळेल जे जबाबदार असेल बचाव उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही बचाव समस्यांचे निराकरण करण्यासाठी असे समित्यांमध्ये शाळांमधील पालकांमधील आणि स्थानीय समुदाय मधील प्रतिनिधी सामील होतील जो समूहिकरीत्या शाळेचे संरक्षण करण्याचे प्रचार व प्रसार करतील या बाबत कार्यशाळा मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली या वेळी साधन व्यक्ति गणेश राठौड़ कुलदीप बोदळे शाहिद इक़बाल खान यानी सदर कार्य शाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले या वेळी सदर प्रशिक्षणाला उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान मोहन तराळे सायफुद्दीन मोईनुद्दीन राहुल्लाह खान सरफराज खान सुरेखा भोपळे उज्वला सरनाईक विजय टपके गजानन गोतरकर शिवशंकरास्वर प्रकाश राठोड शंकर बळीराम पिलात्रे सुशीला महाकाळ गोपाल वाकोडे केशव मुसळे जगन्नाथ अडबोल भीमसिंह राठोड योगेश विष्णुदास कोहर नंदकुमार ज्ञानदेव सोनवणे योगेश अशोक राऊत बेबी खरसडे प्रल्हाद वामन खुळे आधी मोठ्या संख्येने मुख्याध्यापक सदर कार्यशाळाला उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश राठोड यांनी केले
Comments
Post a Comment