∆भाजपचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गोरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा........ ∆३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार......
∆भाजपचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गोरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा....
∆३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार.....
दि.१३ – भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ह्यांचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली आज शोकसभा ३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार असल्याचा इशारा देण्यात आला. वंचित बहूजन युवा आघाडी अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम च्या वतीने गौरक्षण संस्थाच्या बाजूला असलेला रोड एका वर्षात मरण पावल्याने ह्या मेलेल्या रस्त्यासाठी मा प्रदेश महासचिव राजेंद्रदादा पातोडे ह्यांचे अध्यक्षतेखाली “श्रद्धांजली सभा” आयोजित करण्यात आली होती.वंचित बहूजन अकोला पूर्व पश्चिम युवा आघाडी कार्यकर्ते पांढरे कपडे घालून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.७०० फुटाच्या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले.त्यानंतर अकाली मरण पावलेल्या ह्या रस्त्याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
३१ मार्च २०२३ पर्यंत हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास गोरक्षण रस्त्यासाठी श्रध्दा घालण्याचा कार्यक्रम पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ह्यांना निमंत्रित करून आयोजित करू असा इशारा देखील देण्यात आला. आजच्या शोकसभेला शोकाकुल.जिल्हाअध्यक्ष श्रीकांत घोगरे, जय तायडे, आशिष मांगुळकर,कुणाल राऊत महासचिव माजी नगरसेविका किरण ताई बोरखडे,सुवर्णाताई जाधव , मनोहर पंजवानी, जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार,सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे,सचिन शिराळे,उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे,जिल्हा सचिव आनंद खंडारे,विकास सदांशिव , नितीन सपकाळ, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी,आदित्य इंगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, शेखर इंगळे, लखन वाकोडे, रवि वाघ,आदित्य गोपनारायण,नागेश अहिर,अक्षय भालेराव,आशिष शिरसाठ,अंकित इंगळे, ऋषभ इंगळे, सिद्धांत पोहरे,आनंद शिरसाट, श्री तायडे, ओम भुस्कट, महानगर पूर्व संघटक रितेश यादव, गोलू खिल्लारे, सचिन डोंगरे,वैभव वाघमारे, विजय खांदळे, कुमार शिरसाठ, मंगेश सावंग, अमोल तायडे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक ,रत्नपाल डोंगरे, तर शहरातून आकाश गवई, आकाश जंजाळ, दीपक दारोकार, आकाश धुळभरे, नयन काळे, अक्षय सुर्वे, अभी खोंड, विजय शिंदे, पियूष अवचार, लावेश वरघट, विजय मुंडे, प्रकाश ढोकणे, करण पळसपगार, प्रतीक थुंकेकर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment