वंचित बहुजन आघाडीची सांत्वन भेट......
वंचित बहुजन आघाडीची सांत्वन भेट....
दिनांक 28 /3 /2023 रोजी रात्री 9 वाजता बार्शीटाकळी अशोक नगर येथील रहिवासी प्रदीप तुळशीराम इंगळे व व त्यांची पत्नी सविता प्रदीप इंगळे हे दोघे मोटरसायकलने अकोला जात असताना कान्हेरी जवळ रानटी डुक्कर आडवे आल्याने त्यांचा अपघात झाला या अपघातात प्रदीप तुळशीराम इंगळे यांचा जागेवर मृत्यू झाला व त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. ही माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे,अकोला पंचायत समितीचे माजी सभापती आनंद डोंगरे, सोबतच बार्शीटाकळी तालुक्याचे तालुका महासचिव अजय अरकराव, युवा अध्यक्ष अमोल जामनिक, ज्येष्ठ नेते गोबा शेठ, नगरसेवक श्रावण भातखडे, गोरसिंग राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख मिलिंद करवते, ऋषिकेश खंडारे आधी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आणि पीडितांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने योग्य ती मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले
.
Comments
Post a Comment