बार्शिटाकळी इंदिरा नगर येथील दोघी बहिणी नी ठेवला उपवास (रोजा)....
बार्शिटाकळी इंदिरा नगर येथील दोघी बहिणी नी ठेवला उपवास (रोजा)....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ,
बार्शिटाकळी : २४ मार्च पासून मुस्लिम बांधवांचा प्रवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली तेव्हा पासूनच मुस्लिम बांधवांच्या लहान मुला मुलींनी उपवास ( रोजा ) करण्याचा सपाटा चालविला असून आज सोमवारी स्थानिक इंदिरा नगर येथील रायना फातेमा इरशाद खान वय १० वर्ष व मायरा फातेमा इरशाद खान वय ८ वर्ष या दोघा बहिणींनी उपवास ( रोजा ) ठेवल्याने परीसरात त्यांचे कौतुक होत आहे. दोन लहान मुलींनी दि , २७ , मार्च सोमवारी पवित्र रमजान चा ४था (रोजा) एकदिवसीय संकाळ पासून संध्याकाळ पर्यत १४ तास उपवास ( रोजा ) ठेवला. वरील दोन्ही चिमुकले स्थानिक वंचित बहुजन आघाडी चे रूग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान इरफान खान फ्रूट वाले यांचे पुतण्या आहे. दोन्ही मुलींनी उपवास ठेवल्या च्या खुशीत त्यांनी परिसरातील लोकांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये नगर पंचायत चे सर्व पक्षीय सदस्य,प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळी आदींनी सहभाग घेऊन मुलींना पुढील आयुष्यात अशी अनेक धार्मिक व सामाजिक कार्य करण्याचे आशीर्वाद व शुभेछा दिल्या.
Comments
Post a Comment