आकोट येथे श्रामनेर शिबीरा मध्ये लखन इंगळे यांनी दानाच्या रूपात केले फळ फ्रुट अल्पोहारचे दान.......
आकोट येथे श्रामनेर शिबीरा मध्ये लखन इंगळे यांनी दानाच्या रूपात केले फळ फ्रुट अल्पोहारचे दान.......
आकोट शहरातील राहुल नगर आकोट येथे श्रामनेर शिबीर व धम्म मेळावा व्यवस्थापन समिती आकोट व बौद्ध महासभा आकोट यांनी आयोजित केला असुन शिबीर मध्ये प्रमुख मार्गदर्शक पुज्य भन्ते धम्म गुरु शाक्या पुत्र राहुल बोधी व धम्मदेशना पुज्य भन्ते शिलानंद यांच्या मार्गदर्शन मध्ये चालु असुन सोबत श्रामनेर दिक्षा उपाध्याय पुज्य भन्ते विनयपालजी महाथेरो पुज्य भन्ते गुणरत्नजी महाथेरो हे असुन भन्ते नागसेन भन्ते भारद्वज भन्ते चेंद्रमनी भन्ते राहुल भन्ते आनंद भन्ते प्रज्ञानंद यांचा भिक्खू संघ असुन या श्रामनेर शिबीर मध्ये दिक्षा घेतलेले लहान मुले जवळपास 70 पेक्षा जास्त व 50 पेक्षा जास्त मोठया नागरिकांनी दिक्षा घेऊन या सात दिवशीय शिबिरात सहभाग घेतला व धम्म गुरु भन्ते /भिक्खू उपासक उपासिका यांना सामाजिक कार्यकर्ते लखन इंगळे यांनी फळ फ्रुट अल्पोहार दान दिले पुज्य भन्ते धम्म गुरु शाक्या पुत्र राहुल बोधी यांनी राहुल नगर येथे प्रवचन करते वेळी सांगितले की आकोट शहर मध्ये मी प्रथम लखन इंगळे यांच्या घरी आलो होतो नंतर मला याच परिसरात प्रोग्राम मिळत असे गेले असे शाक्या पुत्र राहुल बोधी यांनी सांगितले भन्ते /भिक्खू हे रोज सकाळी मंगलमैत्री पद यात्रा प्रत्येक नगरात खेडयात जाऊन प्रवचन करीत आहेत या शिबिरात सात दिवस चिवर धारण करणाऱ्या नवोदित भिक्खुना धम्म काय आहे पंचशील काय आहे अशा अनेक विषयावर योग्य ते मार्गदर्शन पुज्य भन्ते शाक्यपुत्र राहुलजी व पुज्य भन्ते शिलानंदजी यांनी मार्गदर्शन केले या शिबिराला विशेष सहकार्य आकोट शहरातील प्रत्येक नगरातील युवकांनी व महिला मंडळी यांनी व खेड्यातील नागरिकांनी केले आकोट शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला
Comments
Post a Comment