ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांतग समाजाची संघर्ष यात्रा.....

ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मांतग समाजाची संघर्ष यात्रा.....
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी सप्ताह निमित्य - जिल्हा भर मातंग समाज संघर्ष यात्रा रोजी या यात्रेचे  सुरुवात प्रसंगी उद्घाटन झाले. ही रथयात्रा जिल्हाभर फिरणार आहे व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त याचे समापन होणार आहे
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक अकोला रेल्वे स्टेशन येथून मातंग समाज संघर्ष रथयात्रेला सुरुवात . मातंग समाजाच्या विविध मागण्या घेऊन मातंग समाज संघर्ष रथ यात्रेला आज दिनांक 27 4 2023 गुरुवार रोजी सुरुवात करण्यात आली , उद्घाटन प्रसंगी वंचितच्या मोठे नेत्यांनी हजेरी लावली , माननीय श्री बालमुकुंजी भिरड , शंकरराव इंगळे वंदनाताई वासनिक , सुरेश जी पाटकर , रंजीत वाघ , मनोहर बनसोड , संतोष गवई, शरद इंगोले,  मातंग समाज नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ दांडगे , गजानन भाऊ तायडे, सौ सुनंदाताई चांदणे , संजय भाऊ बोदडे , प्रभाकर बोरकर ,गंगाधर सावळे , नारायण मानवतकर, गणेश झिंगुर्डे , रवी तायडे, भूपेंद्र अंभोरे, विठ्ठल मानकर, संतोष बांगर, गोपाल अंजनकर, अमोल तायडे , मनीषाताई तायडे, या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मातंग समाज संघर्ष रथयात्रेला सुरुवात करण्यात आली, या संघर्ष रथयात्रा 27 एप्रिल ते 10 मे पर्यंत संपूर्ण जिल्हाभर फिरणार आहे, मातंग समाज संघर्ष रथयात्रेचे प्रमुख मागण्या, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अनुसूचित जातीमध्ये वर्ग करून मातंग समाजाला अ ब क ड नुसार आरक्षण देण्यात यावे, वस्ताद लहुजी साळवे शिक्षण आयोग लागू करावा, बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करावी, अशा विविध मागण्या घेऊन संपूर्ण जिल्हाभर स्वाभिमानी पंधरवाडा सप्ताह राबवणार आहे, संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन माननीय गजानन भाऊ तायडे यांनी केले आहे,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे