गारपिटीमुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी.....
गारपिटीमुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागणी...
बार्शिटाकळी तालुक्यात दिनांक २७ एप्रिल ते २९ एप्रिल या दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपोटीमुळे शेतकऱ्यांचे कांदा लिंबू इतर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई करून द्यावे चिंचोली रूद्रायणी येथील ग्रामपंचायत सदस्य रूद्राक्ष अरूण राठोड व सर्व चिंचोली रुद्रायणी, राजनखेड , वाघजाळी , वरखेड , सोनगिरी , येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून बार्शिटाकळी चे तहसीलदार दीपक बाजड यांना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून
त्या शेतकऱ्यांच्या उपजिवीकेचा मुख्य आधार शेती असून याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांच्या समस्या मार्गी लावाव्या तलाठी यांना शेतातील कांदा, गहु, विहीर यांचा सर्वे करून त्याचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन चिंचोली रूद्रायणी येथील ग्रामपंचायत सदस्य रूद्राक्ष अरूण राठोड राठोड यांच्यासह मुन्ना वर्गे, शिवम वाटमारे ,राम राठोड, सुमित वानखडे, निखिल राठोड, राजेश राठोड, सुभाष चक्के, नागरिकांनी निवेदन दिले
Comments
Post a Comment