धोबी, बंजारा आणि ओ.बी.सी. समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश....

धोबी, बंजारा आणि ओ.बी.सी. समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश....
 


अकोला - काल दि. २० मे रोजी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा सदस्य किशोर सुरवाडे यांच्या पुढाकाराने पातुर तालुक्यातील भंडारज, बोडखा आणि आजूबाजूच्या खेडेगावा मधल्या युवकांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.
काल वाडेगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुबोध डोंगरे यांच्या मातोश्री आजारी असल्यामुळे जिल्हाध्यक्ष श्रीकांत माणिकराव घोगरे आणि काही सहकारी यांनी ॲड. सुबोध डोंगरे यांच्या घरी भेट दिली असता तेथे भंडारज येथील जिल्हा सदस्य किशोर सुरवाडे हे भेटले त्यांच्यासोबत असलेले युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये काम कर्णयची इच्छा इच्छा व्यक्त केली असता अवघ्या एका तासांमध्ये रखरखत्या उन्हात 45° मध्ये नियोजन करून छोटेखानी कार्यक्रमामध्ये भंडारज आणि बोडखा या गावांमधील धोबी, ओबीसी आणि बंजारा समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये जाहीर प्रवेश.
 वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाचे सदस्य किशोर सुरवाडे यांच्या पुढाकारात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला त्यासोबत भंडारज ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मामा इंगळे आणि पातुर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते मा. तालुकाध्यक्ष निर्भय दादा पोहरे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा प्रमुख श्रीकांत माणिकराव घोगरे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, श्रीकृष्ण देवकुनभी हे हजर होते.
सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमांमध्ये मोहन रामराव ठाकरे, प्रकाश ठाकरे, अनिल ठाकरे, सुनील राऊत, दिनेश राजपूत, शरद कुंबरे, सदानंद कुंबरे, श्रीकांत वानखडे, सीताराम वानखडे, संभाजी वानखडे, अनिकेत घेघाटे, अनुष भदे, प्रवीण घेघाटे, पवन वसतकार, पवन कुंबरे, शुभम कुंबरे, गणेश वसत्कार, योगेश ठाकरे, अनिल ठाकरे, विकास ठाकरे, प्रेमसिंग राठोड, गोपाल लोखंडे, यांच्यासह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे