अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.धिरज लिंगाडे यांचा सत्कार समारंभ.....
अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.धिरज लिंगाडे यांचा सत्कार समारंभ.....
अकोट :;बसव विचार समिती अकोट तर्फे संपन्न ५/५/२०२३ अकोटला मा.धिरज लिंगाडे (नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य -पदवीधर मतदार संघ अमरावती ) यांचा बसवविचार समिती व लिंगायत बांधवांच्या वतीने डॉ.विशाल आप्पा इंगोले व जेष्ठ सदस्य बांधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सदर सत्कार समारंभ डॉ.विशाल इंगोलें ह्यांच्या कार्यालयात तसेच घरी सर्व समाज बांधव तसेच मित्र वर्ग सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी बसवविचार समितीचे कार्याबाबत माहिती देण्यात आली.लिंगायत समाजाच्या विविध समस्या यावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मा. धिरज लिंगाडे यांनी बसवविचार समितीच्या कार्याबद्दल प्रशंसा केली.सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी अरुण आप्पा सांगळोदकर, संतोष आप्पा आरेवार , मंगेश आप्पा दसोडे,प्रतिक आप्पा गोरे , दिनेश आप्पा मेनसे, सागर आप्पा उकंडे सौ.उर्मिलाताई कासवे, सौ किरण वाघमारे (सांगळोदकर), संजय बोडखे, गजानन डाफ़े, सारंग मालाणी, अनोखं रहाणे,मुकूंद पांडे, अनुप मुंडगावकर ,शशांक आप्पा कासवे,अनिल अप्पा गोंडागरे , नानाअप्पा कुरवाळे , राजेश भुतडा, राजू भालतिलक, विश्वास आप्पा कुरवाळे, प्रवीण डोईफोडे , रवी पांडे , अनिकेत कुलट, सागर राऊत, तसेच सर्व लिंगायत समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment