बार्शिटाकळी शहरातील १९ हज यात्रेकरूंना वैद्यकीय किटचे वाटप.....
बार्शिटाकळी शहरातील १९ हज यात्रेकरूंना वैद्यकीय किटचे वाटप.....
∆डॉ. तनवीर जमाल यांच्या केबी मेमोरियल हॉस्पिटलचा उपक्रम...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे...
बार्शिटाकळी 8 जून केबी मेमोरियल क्लिनिकचे अध्यक्ष डॉ सय्यद तन्वीर जमाल आणि जमियत-ए-उलामा-ए-हिंदचे तालुकाध्यक्ष व मिनारा मशिदीचे इमामखतीब मौलाना अब्दुल सलाम मजहेरी यांच्या हस्ते वैधकिय किट चे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अब्दुल सलाम मजाहेरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हज यात्रेकरूंना हजविषयी माहिती दिली, तर प्रवासादरम्यान डॉ. सय्यद तनवीर जमाल यांनी यांनी आपल्या शैलीत सामान्य आजार कसे टाळावेत तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी व कोणती औषधे घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले, मौलवी एजाज मजाहेरी साहब व मोहम्मद कौसर सेठ, नसरुल्ला खान यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहम्मद अजीम हरुनी यांनी केले. मौलवी एजाज मजाहेरी यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार्शी टाकळी शहरातील 19 हज यात्रेकरू उपस्थित होते.त्यामध्ये नियामत उल्लाह खान, शेख सलीम जमादार व त्यांच्या पत्नी, मोहम्मद युसूफ सौदागर व त्यांच्या पत्नी, आयुब खान जमादार व त्यांच्या पत्नी शेख मुनीर बाबू साहब व त्यांच्या पत्नी. शेख जमीर डीलर, इम्रान मास्टर आणि त्याची पत्नी, मोहम्मद इर्शाद आणि त्याची पत्नी,अमजद खान आणि त्यांची पत्नी, अफरोज खान, मोहम्मद शाकीर आणि त्यांच्या पत्नीचा समावेश होता.
Comments
Post a Comment