एक सही संतापाची मोहिमेस बार्शिटाकळीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद........
एक सही संतापाची मोहिमेस बार्शिटाकळीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद........
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : सध्या महाराष्ट्रा मध्ये जो राजकीय गोंधळ सुरु आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना बार्शीटाकळी च्या वतीने मंगळवार दि 11/7/2023 रोजी मनसे संपर्क प्रमुख विठ्ठलराव लोखंडकर यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष पंकज भाऊ साबळे व उपजिल्हाध्यक्ष सतिष जी फाले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सचिन पाटील गालट यांच्या नेतृत्वात बार्शीटाकळी बायपास येथे एक सही संतापाची हि मोहीम राबविण्यात आली.
गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणाचा जो खेळ सुरू आहे,
त्या संदर्भात आज सर्वसामान्य माणसाला कुठे तरी राग, चीड, संताप व्यक्त करायचा आहे, एकदा कि मतदारांनी मतदान केले की त्यांना पाच वर्षे गृहीत धरून आपला राजकीय खेळ या ठिकाणी सुरु आहे,
त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक सही संतापाची हि मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर मोहिमेस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत त्यांचा राग व्यक्त
केला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष वैभव पाटिल कोहर , महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई राठोड , गजानन काळे, शिवप्रताप मेघाडे, संदीप गोपनारायन, लखन घुगे ,बाळकृष्ण उताने पाटिल, शुभम राजुरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment