अजनी खुर्द येथे श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाची सांगता...
अजनी खुर्द येथे श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाची सांगता.
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : तालुक्यातील मौजे अजनी खुर्द येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी, श्रश्री गुरुदेव सेवा मंडळ व गावक-यांच्या वतीने.दि. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या दरम्यान श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे,श्रीमद् भागवत ग्रामगीता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 24 फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता झाली. भौरद येथील, ग्रामगीता प्रचारक,ह.भ.प. डॉ. अशोक महाराज तावरे यांच्या मधूर वाणीतून कथेचे निरुपण झाले. गेली 60 ते 65 वर्षापासून सुरु असेला हरीनाम सप्ताह आजही अखंडित सुरु आहे. गेली 8 वर्षापासून श्री तावरे महाराज भागवत कथेचे निरुपण करत आहेत. दि. 24 ला. सकाळी 11.00 वा. श्री अशोक महाराज तावरे यांचे काल्याचे किर्तन झाले. त्या नंतर श्री श्रीकृष्ण कावरे व गजानन जाधव यांचे सौजन्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यायं. 5.00 वा. भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुला मुलींनी, राधा कृष्ण, राम ,लक्ष्मण,सिता, हनुमान, शंकरजी. यांच्या वेशभूषा धारण करुन सर्वांचे लक्ष वेधले.वेषभुषा कलाकार श्री गणेश रामदास मुंडे यांनी या सर्व बालकांना सजविले होते. या मध्ये आदित्य शहाने, कल्याणी कावरे, अनुश्री धोत्रे, आचल कावरे, अंजली जाधव,हर्षा बघे,रीतीका जाधव,अक्षरा कावरे या बाल कलाकारांनी सहभाग घेतला होता. मिरवणुकीत वरखेड बु. पुनोती बु. मांगुळ, दोनद बु. येथील वारकरी भाविक सहभागी होते. संस्थान चे अध्यक्ष श्री देविदास कावरे व सचिव श्री सुधाकर कावरे यांचे व्यवस्थापनात गावातील जय शिवाजी युवक मंडळ, जगदंबा युवक मंडळ या तरुणांनी विशेष परीश्रम घेतले. अशी माहीती श्री प्रदीप पाटील गावंडे यांनी दिली.
Comments
Post a Comment