अकोल्यातील वाहनांना सूट द्या; राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको'

अकोल्यातील वाहनांना सूट द्या; राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको'
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : अकोला जिल्ह्यातील वाहनांचा टोल घेऊ नये, अकोला परिवहन 'एम.एच. ३०' असलेल्या वाहनांना टोलनाक्यातून सूट मिळावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड नजीकच्या टोलनाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, मीडिया प्रमुख नरेंद्र बेलसरे, प्रभा शिरसाट, पुष्पा इंगळे, श्रीकांत घोगरे त्यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, सभापती माया नाईक, सभापती रिजवाना परवीन, सभापती योगिता रोकडे, जि.प. सदस्या नीता गवई, माजी जि.प. सदस्या प्रतिभा अवचार, विकास सदांशिव, तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, तालुकाध्यक्ष सुनील सरदार, ससावर खान, सुशील मोहोड, शहाबाज शहा, करण वानखडे, संतोष किर्दक आदी सहभागी झाले होते. याबाबत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे यांना निवेदन दिले. ठाणेदार मनोज केदारे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,