महाप्रसादाकरिता आणलेल्या तेलात भेसळ! 👉ग्रामस्थांची अन्न, औषध प्रशासनाकडे धाव
👉महाप्रसादाकरिता आणलेल्या तेलात भेसळ!
👉ग्रामस्थांची अन्न, औषध प्रशासनाकडे धाव
बार्शिटाकळी : महाप्रसादाकरिता आणलेल्या सोयाबीन तेलात पाण्याची भेसळ असल्याचा आरोप करीत धामणदरी येथील ग्रामस्थांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे धाव घेत तक्रार केली.
तालुक्यातील धामणदरी येथे संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसाद तयार करण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर करण्यात आला, त्या तेलामध्ये पाण्याची भेसळ असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या प्रसादाचे सेवन केल्याने गावातील बरीच मुले, महिला-पुरुष, वृद्ध आजारी पडले होते. १५ किलो पॅकिंगमध्ये असलेले दोन जार सोयाबीन तेल महाप्रसाद आयोजन समितीने बार्शीटाकळी येथील किराणा दुकानातून खरेदी करण्यात आले होते. याबाबत संबंधित सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या जबाबदार यंत्रणेकडे ग्रामस्थांनी समस्या मांडली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परिणामी, या भेसळयुक्त तेलामुळे भविष्यात इतर कोणालाही बाधा होऊ नये व कोणताही गंभीर प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी २२ फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन उपायुक्त अकोला यांचे कार्यालय गाठून रीतसर तक्रार दिली. याची दखल घेऊन भेसळयुक्त तेल उत्पादन करणाऱ्या कंपनीविरुद्ध कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे या तक्रारीवर धामणदरी येथील अक्षय राठोड, शिवम जाधव, सचिन राठोड, मयूर राठोड, अजय चव्हाण, हर्षराज राठोड आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment