शाहिद इक़बाल खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...
शाहिद इक़बाल खान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : महान केन्द्रातिल मा केंद्र प्रमुख उपक्रमशील शिक्षक, शिक्षक संघटना चे जिल्हा अधयक्ष शिक्षणासोबतच समाजसेवा चा वारसा जोपासणारे श्री.शाहिद इक़बाल खान सरफराज खान यांना *राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* देऊन मौलाना आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्काराचे वितरण मौलाना आझाद रिसर्च सेंटर छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे दिनांक.24/2/24 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष *माननीय इम्तियाज जलील साहेब* खासदार औरंगाबाद तर प्रमुख पाहुणे म्हणून *माननीय अब्दुल सत्तार साहेब* अल्पसंख्यांक विकास व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख अतिथी म्हणून *माननीय विक्रमजी काळे* साहेब शिक्षक आमदार मराठवाडा शिक्षक मतदार संघ यांच्या शुभहस्ते सदरील पुरस्काराने शाहिद इक़बाल खान यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी मा.नंदा गायकवाड उपायुक्त औरंगाबाद मनपा मा.अनिल साबळे साहेब उपसंचालक शिक्षण औरंगाबाद मा. खिजर पटेल साहेब प्रदेश प्रवक्ता एमआयएम, प्राचार्य ईनुस पटेल, डॉक्टर सय्यद नईम,डॉक्टर जफर अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. दिलीप ढाकणे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर त्याचबरोबर हॅपी टू हेल्प फाउंडेशन चा संपूर्ण परिवार उपस्थित होता. श्री,शाहिद इक़बाल खान सरांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार माननीय विक्रम काळे सर, यानी सरांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शाहिद इक्बाल खान सरांचे सर्वच स्तरावरुन अभिनंदन होते आहे
Comments
Post a Comment