बार्शिटाकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंताकडे वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार. ∆अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात तिव्र आंदोलन करण्याचा वंचित युवा आघाडीचा इशारा
बार्शिटाकळी ते पिंपळखुटा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंताकडे वंचित बहुजन युवा आघाडीची तक्रार.
अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात तिव्र आंदोलन करण्याचा वंचित युवा आघाडी चा इशारा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव मा. राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आज बार्शिटाकळी ते पिंपळखुटा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत लेखी तक्रार देण्यात आली.
रस्ता दुरुस्ती चे कामाची कींमत ४.५० कोटी रुपये असुन काम सुरू होऊन कित्येक महीने लोटून सुद्धा
सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे कामात नियमांना धाब्यावर बसवून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. अंदाजपत्रकातील नमुद केलेली कामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत.
रस्त्याच्या पहिल्या स्तरात 80mm गिट्टी वापरण्यात आली नाही.
या कामात वापरण्यात आलेला मुरुम हा निकृष्ट दर्जाचा असुन माती मिश्रीत आहे.
सिमेंट, रेती, गिट्टीचे मिश्रण सुध्दा आपल्या नियमानुसार दर्जेदार नाही, संपुर्ण रस्त्यातील गिट्टी बाहेर निघत आहे.
कामावर पाण्याची क्युरिंग करण्यात येत नाही,
ठेकेदारास सदर कामाचे रॉयल्टी परिक्षण, मुरुम, गिट्टी, रेती, मट्रेल च्या चाचणी शिवाय पेमेंट करण्यात येऊ नये.
पावसाळा २ हप्त्यावर आला असून नागरिकांच्या दळणवळणाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे,
सदर रस्ता दुरुस्तीच्या कामात ठेकेदारामार्फत प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नियमांनुसार करुन घ्यावे तसेच काम त्वरित सुरू करावे व कार्यकारी अभियंता यांनी स्वतः या रस्त्याच्या कामाची पाहणी करावी, व संबधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले,
आपल्या स्तराहून कार्येवाही न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला, यावेळी बार्शीटाकळी युवा आघाडी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, तालुका महासचिव अक्षय राठोड, अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, जिल्हा सचिव श्रीकृष्ण देवकुंणबी, शहर अध्यक्ष वैभव खडसे, अकोला तालुका प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, जय तायडे, सचिव आनंद खंडारे, सूरज दामोदर, भूषण सरकटे, वीरेंद्र अरखराव, तुषार वाहुरवाघ, रोहन अरखराव आकाश जंजाळ प्रसिद्ध , यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment