अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.....

अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली अकोला जिल्ह्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील सैन्यात महार रेजिमेंट मध्ये असलेले सैनिक प्रवीण जंजाळ यांना जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झाली होती 
आज वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी शहीद प्रवीण जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे येथील घरी त्यांच्या परिवाराची सांत्वन्पर भेट घेऊन प्रवीण जंजाळ यांच्या आई वडील व भावांना धीर दिला यावेळी शहीद प्रवीण जंजाळ यांचे आई वडील तसेच मोठे भाऊ व गावातील नागरिक उपस्थित होते अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, पंचायत समिती उपसभापती अजय शेगावकर ,माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, गावच्या सरपंच ताई तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, गजानन गवई , शरद इंगोले, मेजर सरदार, मेजर आतिश शिरसाट , सना भाई , जंजाळ गुरुजी , दीप जंजाळ , शंकरराव राजुस्कर , संजय किर्तक , प्रदीप पळसपगार , सिद्धार्थ पळसपगार, सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वंचित बहुजन आघाडी अकोला चे माजी नगरसेवक सुनील जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी अँड बाळासाहेब आंबेडकर यांची सांत्वन पर भेट
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला: वंचित बहुजन आघाडी व पूर्वीचे भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी तसेच अकोला महानगरपालिका येथील माजी नगरसेवक सुनील जगताप यांचे दुःखद निधन झाले होते आज आज अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या चिखल पुरा अकोला येथील घरी जाऊन त्यांच्या परिवाराची सांत्वन्पर भेट घेतली सुरुवातीच्या काळापासून आंबेडकरी चळवळीला अकोला शहरामध्ये योगदान देणारे तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सुरुवातीपासून एक निष्ठा असलेले नगरसेवक सुनील जगताप यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे वडील आई पत्नी व मुलगा यांची आज भेट घेऊन सुनील जगताप यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाबाबत त्यांच्या आई-वडिलांची चर्चा करून जुन्या आठवणीला उजाळा दिला यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे वंचित नेते संतोष हुसे गजानन गवई तालुकाध्यक्ष किशोर जामनिक महासचिव शरद इंगोले शहर महासचिव मनोहर बनसोड सना भाई मेजर सरदार सह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,