बार्शिटाकळीत शिवसेना (उबाठा )च्या वतीने भव्य नेत्ररोग निदान व उपचार शिबिर संपन्न ... 👉 २५६ रूग्णांनी केली तपासणी, ८७ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया.....
बार्शिटाकळीत शिवसेना (उबाठा )च्या वतीने भव्य नेत्ररोग निदान व उपचार शिबिर संपन्न ...
👉 २५६ रूग्णांनी केली तपासणी, ८७ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व भगवा सप्ताहाचे औचित्य साधून खासदार अरविंदजी सावंत यांच्या आदेशाने अकोला संपर्कप्रमुख प्रकाशजी शिरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन बाप्पू देशमुख, व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ भाऊ दातकर यांच्या हस्ते 20 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब ऑफ इंडिया, दमाणी हॉस्पिटल व गोपाल भटकर (मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ व जिल्हा परिषद सदस्य, अकोला) यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या शिबिरात तालुक्यातील 265 रुग्णांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 87 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी दमाणी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अनेक रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक गोपाल भटकर यांनी केले. अशीच कृतज्ञता निलेश मनाटकर यांनी व्यक्त केली.
यावेळी योगेश भाऊ लाहोडकर यांची खरेदी विक्री संघाच्या उपाध्यक्षपदी निवड होऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटक विजू भाऊ दुतोंडे, उपजिल्हा प्रमुख मंगेश भाऊ काळे, तालुका प्रमुख गजानन मनटकर, शहर प्रमुख उमेश राऊत, उपविभागीय प्रमुख नितीन इंगळे, पांडुरंग ठक, अरविंद काकड, बंडू शिंदे, उपसंघटक योगेश भाऊ लाहोडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक भाऊ इंगळे, जि.प.सदस्य बंडू राऊत व गणेश बोबडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख विकेश हिरणवाडे, युवासेना तालुका प्रमुख शेरसिंग जाधव, रुक्मणी सोनोने, किसान सेना तालुका प्रमुख प्रदीप खांडे, अल्पसंख्याक शहर प्रमुख शेख मुंतजीर, जीवन राऊत, निखिल ठाकरे, कृष्णा पाचे, आदी उपस्थित होते. विजू आगरकर, निलेश निलखान, रमेश बोढे, शुभम म्हस्के, कुणाल भट उपस्थित होते. या शिबिरात जे रुग्ण उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मूर्तिजापूर विधानसभा निमंत्रक तथा जिल्हा परिषद सदस्य अकोला यांनी दिली.
Comments
Post a Comment