हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण संपन्न... भाजपा पदाधिकारी यांचा पुढाकार
हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण संपन्न...
भाजपा पदाधिकारी यांचा पुढाकार
बार्शिटाकळी : हिंदू स्मशानभूमी वाहन स्थळ येथे वृक्षारोपण आमदार हरिष भाऊ पिंपळे यांचें सहकार्यातून तसेच एस नाथन यांचे मार्गदर्शनाखाली बार्शिटाकळी येथील हिंदू स्मशान भुमी स्थळ येथे शहर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
जवळ पास 624 झाडे त्या ठिकाणी लावण्यात आली वृक्ष रक्षा बंधन दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम घेण्यात आला झाडाला राखी बांधुन हा दिवस साजरा करण्यात आला. आमदार हरिष पिंपळे म्हणाले की मोकळ्या जागी एक झाड लावावं त्याला जपाव लहानाचं मोठं करावं फळांची अपेक्षा न करता कारण तेच झाड काही न बोलता काही न मागता अंगणभर सावली देणारं हे माञ नक्की देशभरात वृक्ष चळवळ निर्माण व्हावी कुटुंबातील एक सदस्य समजुन वृक्ष प्रति आत्मीयता राहावी बार्शीटाकळी शहरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपणास राबवायचा आहे असे ते म्हणाले झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला एस नाथन यांचे मार्गदर्शनाखाली सदर झाडे लावण्यात आली सदर वृक्षारोपण अनंत केदारे बार्शिटाकळी भाजपा प्रदेश सदस्य किसान मोर्चा , प्रविण धाईत शहराध्यक्ष भाजपा, सौरभ अग्रवाल बुथ प्रमुख, महेफुज खान अल्प संख्याक शहराध्यक्ष भाजपा, रवि हिवराळे , माजी सैनिक राहुल बोडखे, विवेक खोडके सर , नागेश ठाकरे शक्तीपीठ प्रमुख , सुरेंद्र चव्हाण , रतन टेकाम , विजय चव्हाण, अमोल केदारे, गोलु दांदळे, प्रसाद केदारे , आकाश धाञक बुथ प्रमुख , साई कोडेवार , साहील कोडेवारं , महादेव धाईत, जितेंद्र धात्रक , सुरज ठाकुर , कुणाल ठाकुर , अर्जुन काळदाते , बबन ढेगंळे , दिनेश रत्नपारखी , गोलू धाईत, प्रथमेश ठाकरे , ओम चव्हाण , यांनी श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाला हातभार लावला
Comments
Post a Comment