अभिनेता सोनू सुद कडून सर्वेश साबेचा गौरव अमेरिकेत शिकणाऱ्या सर्वेशचा गरजूंना मदतीचा हात...
अभिनेता सोनू सुद कडून सर्वेश साबेचा गौरव अमेरिकेत शिकणाऱ्या सर्वेशचा गरजूंना मदतीचा हात
बार्शिटाकळी : कृषी उत्पन्न बाजार समिति बार्शिटाकळीचे संचालक महादेवराव साबे, शालिग्राम साबे यांचा नातू सर्वेश देवेन्द्र साबे (१५) हा इयत्ता ९ वी अमेरिकेमध्ये शिकत असुन त्याला सामाजिक व परोपकारी कार्याची आवड आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी 'युएस किड फॉर वॉटर ॲण्ड सेवा' या संस्थेच्या माध्यमातून भारतातील गरिव गरजू लोकांना विविध प्रकारची माइत व साहाय्य करुन प्रोत्साहन देण्यात येते. सर्वेश उपक्रम राबवितो.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अभिनेता सोनू सुद यांनी कौतूक केले.
वाचनालयामध्ये पुस्तके लावणे, मुलांना वाचना करीता प्रोत्साहित करने, लहान मुलांसाठी फुड कॅम्प चालविणे, शनिवार व रविवार दोन दिवस भारतीय मुलांचे इंग्लिश क्लासेस घेणे आदी उपक्रमाद्वारे सर्वेश व त्याचे सहकारी निःस्वार्थ सेवा देतात. सामाजिक कार्यात उत्तुंग कार्य करणारे बॉलीवुड अभिनेता सोनु सूट यांनी अमेरिका दौऱ्या प्रसंगी सर्वेशला कौतुकाची थाप देऊन तोंडभरून कार्याची प्रशंसा केली.
Comments
Post a Comment