मुस्लिम समाजाचे ठाणेदारांना निवेदन....

मुस्लिम समाजाचे ठाणेदारांना निवेदन....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करणेबाबत मुस्लिम समाजाच्या युवकांकडून बार्शिटाकळीचे पोलीस निरीक्षकांना रविवारी निवेदन देण्यात आले.
रामगिरी गुरु नारायण मिरी महाराज, सरला बेट यांनी पंचाळे, ता सिनर या विकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मतीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सैय्यद मुजमिल व सैय्यद असद अली यांच्यासह मोठ्या संख्येने युवकाची उपस्थिती होती


👉भूमि अभिलेख कार्यालय बार्शिटाकळी येथे होतात खोट्या नोंदी!
👉बेकायदेशीर फेरफार, नोंदीची कायदेशीर चौकशी करा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : भूमी अभिलेख कार्यालयात खोटे कामे होत असल्याचा आरोप एका युवकाने केला आहे, लवकर तसेच कोणत्याही अर्जदारांची किंवा कोणतेही कायदेशीर काम वेळेवर करत नाहीत, मनमानी कारभार सुद्धा भूमी अभिलेख कार्यालय येथे सुरु आहे बेकायदेशीर फेरफार नोंदी होत असल्यामुळे तालुक्यातील नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे, या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी तक्रारकर्ते ओम दिगंबर दाते राहनार महान यांनी केली आहे. महान येथील प्लॉट नंबर ५३१ सीट नंबर दोन ज्याचे क्षेत्रफळ २३.६० असा असून सदर प्लॉट हा तुकाराम गोविंदा दाते यांच्या नावाने आहे, त्या जागीचे फेरफार करणे, वारस नोंदीचा अर्ज कायदेशीर नसताना व कोणताही अधिकार नसतांना भूमि अभिलेख कार्यालयात प्रमोद वाघाडकर यांनी वारस नोंद  व नोंदी बेकायदेशीर नोंद केले आहेत तसेच पार्वतीबाई तुकाराम दाते ही महिला २०१५ मध्ये मयत आहे, तीला नोव्हेंबर डिसेंबर २०२३ सा तिच्या नावाने चारम नोंद केली, सदर महिला ही २०१५ मध्येच मयत असून २०२३ ला बारस कशी झाली? हा एक मोठा प्रश्न आहे, हे सर्व प्रकरण उजमीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळीच्या उपअधीक्षक इमूब हुसेन शहा तसेच परीक्षण भूमापक प्रमोद श्रीराम वाघाळकर यांनी सदर नोंदी केलेला आहे, वारस नोंद करते वेळी मयत व्यक्ती कधीही वारस चडु शकत नाही, व वारस नोंद करतेवेळी अर्जदार हा आखीव पत्रिकेवरील मूळ मालकाचा हयात वारस असने गरजेचे आहे. तसेच वारस नोंद करतेवेळी कोर्टाचे वारस पत्र लावने हे सुद्धा गरजेचे आहे.
विनावारस पत्राची नोंद कायद्याने करता येत नाही, दुसऱ्यानेच अर्ज देऊन ही नोंद केली गेली, यासाठी एक लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे, या नोंदीचा मोबदला म्हणून भरपूर रकम वाघाळकर व शहा यांनी घेतली असे दिसून येते, असा आरोप सुद्धा ओम दाते यांनी केला आहे. कारण की ज्या महिलेच्या नावाने प्रॉपर्टी नाही, त्या महिलेच्या नावावर प्रॉपर्टी केली कशी? याची आधी चौकशी व्हायला पाहिजे, तसेच ती महिला २०१५ मध्ये मयत आहे व प्रॉपर्टी २०२३ ला तिच्या नावाने केली, व खरेदी नोंद सुद्धा त्या प्रॉपर्टीवर केली परंतु महिलेच्या नावावर प्रॉपर्टी ही २०२३ मध्ये वारस नोंद म्हणून केली, महिला मयत असून सुद्धा जी नोंद २०२३ मध्ये केली आहे, तसेच पार्वताबाई तुकाराम दाते असे त्या महिलेचे नाव आहे, व त्याच महिलेची खरेदी सुद्धा यांच्याकडे आढळून आली आहे. अर्जदार सुरेश वामन शेवलकर यांनी ती बनावट खरेदी दाखल करून नोंद सुद्धा गैर कायदेशीर पणे केली आहे, अशी लेखी तक्रार ओम दिगंबर दाने राहगार महान यांनी केली आहे, त्यांनी तक्रारीत म्हटले की, पार्वतीबाई तुकाराम दाते यांच्या नावाने प्रापर्टी २०२३ ला वारस नोंद मधून केली, तर खरेदी नोंद ही २०२३ ला केलेली आहे. परंतु त्या अर्जासोबत खरेदीखत हे १९८७ सालीचे लावलेले आहेत, व ती खरेदी पार्वताबाई तुकाराम दाते यांच्या नावाने आहे, परंतु पार्वतीबाई तुकाराम दाते यांच्या नावाने नमताना १९८७ सालि खरेदी झाली हाली कती? हे भूमी अभिलेख ये उपअपीक्षक यांनी फेरफार घेते वेळी विचार करणे गरजेचे होते, परंतु तो विचार त्यांनी केला नाही, असे दिसते कारण त्यांनी त्याबदल्यात भरपूर रकम घेतली असल्याची चर्चा तालुक्यात चर्चा आहे
तक्रार मध्ये असे नमूद आहे की, पार्वताबाई तुकाराम दाते यांच्या नावाने भूमी अभिलेख कार्यालयाची आखीव पत्रिका तसेच कुठलीही मालमता नसताना त्यांच्या नावाने १९८७ साली खरेदी झाली कशी?  आणि त्यांना विकण्याचा अधिकार कोणी दिला सदर फेरफार करते वेळी जी खोदी फेरकार ला लावलेली आहे.
त्या खरेदीवर कुठल्याही प्रकारचा 
मालमत्ता क्रमांक नाही, तसेच चतुर सीमा सुद्धा चुकीच्या आहेत, हे माहीत असून सुद्धा वाघाळकर पांनी फेरफार नोंद केली, सदर नोंद चुकीची आहे. वाघाड़कर यांनी दुसऱ्याकडून आलेला फेरफार अर्जावर फेरफार करण्याचा अधिकार नसताना सदर फेरफार चुकीचा केला, व मूळ मालकाच्या वारसाची फसवणूक सुद्धा केली व आपल्या पदाचा दुरुपयोग केला. तक्रार मध्ये असे सुद्धा म्हटले, त्यासाठी या गंभीर प्रकरणाची कायदेशीर चौकशी होणे सरजेचे आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुध्दा करावी, असे तक्रार मध्ये म्हटले आहे. सदर फेरफार करते वेळी मूळ मालकाचे वारस यांच्याकडून अर्ज आल्यावरच नोंद करता येते, तसेच वारस नोंद करतेवेळी कोर्टाचा वारस दाखला असल्याशिवाय वारस नोंद करता येत नाही असे भरपूर खोटे काम भूमि अभिलेख कार्यालय बार्शिटाकळी येथे पैसे देऊन होतात. अशी चर्चा आहे, वाघाळकर व उपअधिक्षक शहा यांच्यावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ओम दिगंबर दाते यांनी तक्रारीतून केली आहे.

बार्शिटाकळी येखील भूमी अभिलेख कार्यालयामधील शहा आणि वाघाळकर यानी बेकायदेशीर फेरफार नोदी  केल्या आहेत, यासाठी त्यांनी पैसे सुद्धा घेतल्याची चर्चा आहे, या प्रकरणी वरीष्ठाकडे सुध्दा तक्रार केलेली आहे. याची चौकशी  आणि कारवाई होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा मला माझ्या आईसह भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसावे लागेल,
:- ओम दिगंबर दाते, तक्रारकर्ता

🌀तक्रार कर्त्याने माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहे. मी कोणतीही फेरफार व नोंदीचे काम बेकायदेशीर केले नाही, आमच्या कार्यालय विरोधात केलेली तक्रार ही खोटी आहे. 
- प्रमोद श्रीराम वाघाळकर, भूमी अभिलेख कार्यालय बार्शीटाकळी 


विझोरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शीटाकळी :पृथ्वी पॅनल्स विझोरा व रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट यांच्या संयूक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांनी लाभ घेऊन औषध वाटप करण्यात आले.
शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरी क्लबच्या अध्यक्षा पुनम मुदंडा, सेक्रेटरी रमण राठी, अशोक मुंदडा, पुरुषोत्तम श्रावगी, चंद्राकाश लढ्ढा , अशोक पंड्या, ओंकार गांगडे, मोहीत भाला, ब्रिजमोहन , चितला गे ,भूषणकुमार ताजणे, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष साहेबराव गवई, माजी सरपंच सुरेश जाधव, विष्णु शिंदे , आदि मान्यवरांची उपस्थिती लाभती होती. पृथ्वी पॅनल्स येथील ध्वजारोहणच्या अध्यक्षा पुनम मुंदडा यांच्या हस्ते केले. पॅनलच्या संचालिका निशा शेठी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिबिरात दंत रोग तज्ञ डॉ. सत्यनारायण खोरीया, डॉ सवैश खोरीया, डॉ आयुषी खोरीया, बीपी शुगर तज्ञ डॉ जयंतीलाल बाघेला, होमीओपैथी तज्ञ डॉ. मुकुंद पाठक, डॉ. गोपाल जगताप, डॉ. अस्मिता तेलगोटे, डॉ. सुवर्णा रोगु या तज्ञ डॉक्टरांनी मोफत रुग्ण तपासणी केली. अशोक मुंदडा व प्रविण टावरी यांच्या हसते औषधाचे माटप करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पॅनल्सचे माणिक जाधव , राज वानरे, प्रशांत सिंग राजपूत, डोबाजी गवई, कोकणे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,