पोलीस उपनिरीक्षक कु निकीता गणेशराव अंबुसकर हिचा अकोलेकरांच्या वतीने जंगी सत्कार....
पोलीस उपनिरीक्षक कु निकीता गणेशराव अंबुसकर हिचा अकोले करांच्यावतीने जंगी सत्कार...
अकोला : नाभिक समाजाचे प्रतिष्ठित नागरिक येथील गणेशराव अंबुसकर यांची कन्या कु निकीता हिने नुकतेच पिएसआय बॅच १२४ नाशिक येथुन प्रशिक्षण पुर्ण करुन अकोला नगरी मध्ये प्रथम आगमन प्रसंगी तिचे अकोले करांचा स्वाभिमान म्हणून श्री विनोद अंबुसकर मित्र परिवार यांनी स्वराज भवन अकोला येथे कु निकीताचा जंगी सत्कार करण्याचे आयोजन केले होते
त्यावेळी अकोला जिल्हा महिला कॉग्रेसच्या पुजा ताई काळे, बार्शिटाकळी नगरपंचायत चे माजी नगरसेवक श्रावण भातखडे, जेष्ठ समाजसेवक नंदुभाऊ बोपुलकर, (सेवानिवृत्त अभियंता पाटबंधारे विभाग) नारायणराव कळमकर, भारिप बहुजन महासंघाचे माजी महासचिव दीपकजी गवई , एडवोकेट आनंद गुढईकर , जय वाटुरकर , नरेंद्रजी लोळे , भूषण अंबुसकर , निकीता चे वडील श्री गणेशराव अंबुसकर, श्री मोकळकर साहेब, विनोद अंबुसकर, नरेंद्र ईगळकर, गजानन वाघमारे, अनिल शिंदे, निवृत्ती रुद्रकार , दिनेश श्रीवास, शिवलाल माझोडकर, अनिल वायकर, सेवानिवृत्त ग्रामसेवक अंबुसकर साहेब, आदी मान्यवर व नाभिक समाज बांधव व महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र ईगळकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद अंबुसकर यांनी केले
Comments
Post a Comment