बार्शिटाकळी येथे महानुभाव पंथाचा कार्यक्रम साजरा
बार्शिटाकळी येथे महानुभाव पंथाचा कार्यक्रम साजरा
बार्शिटाकळी: येथे महानुभाव पंथाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.
यावेळी आलेगाव निवासी तपस्विनी रुक्मिणी आक्का या उपस्थितीत होत्या. तसेच मूर्तिजापूर मतदारसंघाचे आ. हरीश पिंपळे यांच्या पत्नी नूतन पिंपळे यांनी पंथाच्या साधुसंताचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महंतई गोलीकरबाबा यांनी केले. यावेळी तपस्वीनी रुक्मिणी दीदी अक्का यांनी श्री चक्रधर स्वामी यांचे विचार अंगीकारणे तसेच मुलावर चांगले संस्कार करण्याची गरज आहे. अशाप्रकारचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालक किरण वाघमारे तर आभार मनोहर ढोरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महानुभाव पंथातील अनेक जण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
👉'त्या' व्हॉट्स ॲपवरील व्हायरल व्हिडीओमुळे पसरली भीती !
👉मुलीवर वाघाने हल्ला केल्याचा होता व्हिडीओ
बार्शिटाकळी : तालुक्यातीत अनेक सोशल मीडियाच्या पुपवर पिंजर से महान रस्त्याला लागून असलेल्या एका शेतात वाघाने मुलीवर हल्ला केल्याचा हिडिओ टाकण्यात आला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर हा हिडीओ फेक असल्याचे समोर आल्याने जनतेने सुटकेचा श्वास सोडला.
बार्शिटाकळी तालुक्यातील मोबाइलच्या विविध सोशल मीडिया ग्रुप वर ३ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास पिंजर ते महान रस्त्याला लागून असलेल्या शेतात एका मुलीवर वाघाने हल्ला केल्याचा विडिओ सोशल मीडियावर सर्वत्र
प्रकाशित झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात सखोल चौकशी केली असता सदर व्हिडिओ हा या रस्त्यावरील नसल्याची माहिती रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्पष्ट झाली. सदर रस्त्यावर या संदर्भात कोणतीच घटना घड़ली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली जी घटना घडलीच नाही त्याबद्दल चुकीची व दिशाभूल करणारी माहिती कोणीही सोशल मीडिया ग्रुप वर टाकु नये अशाप्रकाचे मत सामाजिक कार्यकर्ते अनंता केदारे यानी यावेळी व्यक्त केले
हरभरा, तुरीवर अळ्यांचे आक्रमण!
■ फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला
■ मजुरांचीही जाणवत आहे वानवा
बार्शिटाकळी : तालुक्यात सद्यस्थितीला शेतकऱ्याच्या शेतातील तूर व हरभरा या पिकावर मोठ्या प्रमाणात हवामानातील बदलामुळे अ ळ्याचे आक्रमण झाले आहे फवारणीच्या व मशागतीच्या कामाला वेग आला असला तरी शेतकऱ्याला शेतात कामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे.
तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात खरिपाची शेती करतो. यावर्षी शेतकऱ्यांनी सलग सोयाबीन व तूर सोयाबीन, तूर-कपाशी अशा प्रकारची पिके मोठ्या प्रमाणात पेरली आहेत. तसेच यावर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. या पिकावर मोठ्या प्रमाणात मादी पतंग अंडी घालून अळ्यांची निर्मिती करीत असल्याने हरभरा व तूर पिकांचे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देणे, हरभरा व तूर पिकातील ताण नष्ट करणे, कीटकनाशकाची फवारणी, डवरणी करणे, अशा मशागतीच्या कामाला वेग आला आहे. सद्यस्थितीला अनेक गावातील शेतकरी ट्रॅक्टरवरील यंत्राद्वारे किंवा मशीनद्वारे फवारणीचे शेतातील मशागतीचे व तण नष्ट करण्याचे काम करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टर २० ते २२ पक्षी थांबे उभारावेत जेणेकरून सदर पक्षी पिकावरील अळ्या खातील. तसेच शेतकऱ्यांनी पिकावर निंबोळी अर्क किवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के तसेच विविध प्रकारच्या कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. आवश्यकता पडल्यास १५ दिवसात दोन फवारण्या केल्यास पिकावरील सर्व अळ्या व अंडीकोश नष्ट होऊ शकतील अशा प्रकारची माहिती तालुका कृषी अधिकारी संध्या कारवायांनी यावेळी दिली.
👉शासकीय योजनांचाही मुजरांवर परिणाम
शासनाने मोफत अजधान्य व इतर योजनांची निर्मिती केल्याने मजुरांची काम करण्याची इच्छा नसल्याची विदारक परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत निर्माण झाल्याने शेतातील कामाला मजूर मिळत नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. वास्तविक पाहता शासनाने शासकीय सवलती व योजना देण्यापूर्वी ज्या व्यक्तीला आवश्यकता आहे किंवा गरज आहे त्यांनाच आरक्षण व मोफत योजना देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
Comments
Post a Comment