आरोग्य विभागाच्या वतीने माध्यमिक आश्रम शाळा पिंपळखुटा येथे धनुर्वात व डांग्या खोकला प्रतिबंधात्मक लसीकरण

आरोग्य विभागाच्या वतीने माध्यमिक आश्रम शाळा पिंपळखुटा येथे धनुर्वात व डांग्या खोकला प्रतिबंधात्मक लसीकरण
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :   तालुका आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप बार्शी टाकळी उपकेंद्र भाग एक अंतर्गत पिंपळखुटा येथे 
 बळीरामभाऊ सिरस्कार वि.जा. भ.ज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पिंपळखुटा ता.बार्शिटाकळी जि.अकोला येथे धनुर्वात व डांग्याखोकला टि.डि. लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
 अतिशय गंभीर आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात आली आश्रम शाळेमध्ये एकूण 58 मुले व 35 मुली वयोगट 16 वर्षे किशोरवयीन मुल मुली यांना या गंभीर धनुर्वात व डांग्या खोकला आजारांच्या संरक्षणाकरिता ही विशेष लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरी सरप प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका संगीता जाधव व स्वास्थ्य अभ्ययंग्यता मंजू घन यांच्या उपस्थिती ही मोहीम राबवण्यात आली तसेच वयोगट 10 वर्ष 25 मुले व 13 मुली यांना सुद्धा धनुर्वात व डांग्याखोकला गंभीर आजारांशी संरक्षण करण्याकरिता टी डी लसीकरण करण्यात आले,तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रविंद्र आर्य यांचे विशेष व मुख्य मार्गदर्शन अंतर्गत TD लसीकरण पिंपळखुटा निवासी आश्रम शाळेमध्ये मोहीम राबविण्यात आले आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल बायस्कार, निलेश जाधव अधिक्षक, के.एस. राठोड सा.शिक्षक, सुमित ठाकरे सा.शिक्षक, उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,