अवैध सावकारी प्रकरणी सावरखेड येथील दोघाविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल
अवैध सावकारी प्रकरणी सावरखेड येथील दोघाविरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल
बार्शिटाकळी, (तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे ) : अवैध सावकारी प्रकरणी बार्शिटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील अवैध सावकार रमेश साहेबराव देशमुख यांचे सह दोघा विरुद्ध पिंजर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी पिंजर पोलिसात तक्रार दाखल केली आहे, त्यानुसार रमेश आणि आनंदा या दोघाविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे, या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते,
गोरगरिबांचे रक्त पिनाऱ्या रमेश साहेबराव देशमुख आणि आनंदा मोहादे याची विरुद्ध कारवाई झाल्यामुळे बार्शिटाकळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी
आनंद व्यक्त करून जल्लोष केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कल्पना बबन हिवराळे राहणार सावरखेड यांनी अवैध सावकारी प्रकरणी सहायक निबंधक यांच्याकडे रमेश आणि आनंदा विरुद्ध तक्रार दाखल केली होती, रमेश देशमुख हा सावरखेड तालुका बार्शिटाकळी येथील रहिवासी असून त्याने आजपर्यंत अनेक गोरगरिबांचे रक्ताचे शोषण केले आहे, अवधू सावकारी इथून अनेकांच्या जमिनी पचविल्या आहेत, तर त्याचा दुसरा साथीदार आनंदा शिवराम मोहादे राहणार शेंदुरर्जुना मोरे तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम या दोघाविरुद्ध सहायक निबंधक कार्यालयाने पिंजर पोलिसांत अवैध सावकार व्यवहार प्रकरणी फिर्याद
दाखल केली, फिर्यादीवरून पिंजर पोलिसांनी दोघा अवैध सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, रमेश आणि आनंदा विरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी ( नियमन) अधिनियम २०१४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, या रक्तपीपासू अवैध सावकार व्यावहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते, याबाबत पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधरजी दराडे, तपास अधिकारी दत्तात्रय चव्हाण, बीट जमादार नामदेव मोरे व त्यांचे महकारी पुढील तपास करीत आहेत, ही कारवाई झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,
Comments
Post a Comment