गुलाम नबी आझाद महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न
गुलाम नबी आझाद महाविद्यालयात शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न
बार्शिटाकळी : स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शिटाकळी जि अकोला, येथेे राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त प्रतीमेचे पुजन करून शिवजयंतीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बि एस खान यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितत जयंती साजरी करण्यात आली. शूरता हा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, क्षत्रिय हा माझा धर्म आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे, अशा थोर महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनीमी काव्याची तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे डॉ मनीष अहीर, डॉ बि एस खान, डॉ चव्हाण, श्री पंजाब राठोड, श्री नामदेवजी, प्रिया जामनीक, अंकुश मोहोड, सविता धनगोल व इतर उपस्थित होते. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही एस उंडाळ व सोबतच विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवाजी महाराज जयंती साजरी....
बार्शिटाकळी : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालयामध्ये शिवजयंती तसेच बाबासाहेब धाबेकर जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बार्शिटाकळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री रमेश पाटील बेटकर , उपसभापती अशोकराव इंगळे , बार्शिटाकळी खरेदी विक्रीचे अध्यक्ष राजू पाटील महल्ले, व्यवस्थापक संतोष म्हैसणे , माजी नगराध्यक्ष मेहफूज खान , डॉक्टर तनवीर, अजहर भाई, गुड्डू भाई, हसन शाह , रुपराव ठाकरे , शिवा केदार , दत्ता महल्ले, विनोद बेटकर , गोपाल काळे, प्रवीण नानोटे, संदीप सरप, राजू कोहर , अन्सार खान, मखराम पवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment