माणसाला घडविण्यासाठी स्वतः जागृत होणे गरजेचे_ पूज्य भन्ते बी. संघपाल महाथेरो........................ 👉दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराची सांगता............... 👉भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम.............

माणसाला घडविण्यासाठी स्वतः जागृत होणे गरजेचे_ पूज्य भन्ते बी. संघपाल महाथेरो.....
👉दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराची सांगता.... 
 👉भारतीय बौद्ध महासभेचा उपक्रम....
 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : माणसाला घडविण्यासाठी आधी स्वतः जागृत होणे गरजेचे आहे तेव्हा कुठे आपण दुसऱ्याला घडू शकतो आणि एक आदर्श समाज निर्माण करू शकतो असं वक्तव्य दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराच्या सांगता समारोहाला पूज्य भंते बी.संघपालजी महाथेरो यांनी आपल्या धम्म देसनामध्ये सांगीतले. 
नुकताच सिंदखेड मोरेश्वर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबीर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाला पुज्य भन्ते श्रध्दापालजी, भारतीय बौद्ध महासभेची जिल्हाध्यक्ष आद. पी. जे.वानखडे सर, सरचिटणीस नंदकुमारजी डोंगरे, कोषाध्यक्ष विजयजी जाधव, संस्कार विभाग प्रमुख डि. एस. ननिर सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष मा. भारत आकोडे हे होते. या दहा दिवशी शिबिराला प्रमुख मार्गदर्शक, केंद्रीय शिक्षक तथा राष्ट्रीय सचिव आद. अनिल मनोहर गुरुजी हे उपस्थित होते. 
या दहा दिवसिय शिबिराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला, तालुका बार्शीटाकळी आणि गाव शाखेच्यावतीने करण्यात आले. एक आदर्श समाज निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर, महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आणि समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्या जाते. जेणेकरून समाजात गुणवान, मानवतावादी पिढी निर्माण व्हावी. आपापसात समता,बंधुत्व निर्माण व्हावे. या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले जाते. तथागत भगवान गौतम बुद्धांचा सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना समानतेची वागणूक देतो तो विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम या धम्म शिबिराच्या माध्यमातून केल्या केल्या जाते.या शिबिराला सिंदखेड या गावातील सर्व जाती, धर्माच्या, पंथाच्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तन, मन, धनाने सहकार्य केले.या दहा दिवसांमध्ये गावातील आणि आजूबाजूच्या गावातील, परिसरातील वातावरण धम्ममय, प्रसन्न,आनंदमयी झाल्याचे दिसून आले. या श्रामणेर शिबिरामध्ये 45 श्रामणेर प्रशिक्षणार्थ्यांना जवळजवळ 39 धम्मविषयक विषयांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण वरिष्ठ केंद्रीय शिक्षक नंदकुमारजी डोंगरे, ननीर सर, पंचशील गजघाटे, रवींद्रजी दारोकार गुरुजी, राजेश दारोकार, आयुष्यान मेश्राम ,विलास बावस्कर, दादाराव दाभाडे, सरोज डोंगरे, भाऊसाहेब थोरात, कांताबाई थोरात यांनी दिले. त्याचप्रमाणे महिला उपासिका धम्म विषयक प्रशिक्षण शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका आयु.सुनंदाताई तेलगोटे केंद्रीय शिक्षका तथा राज्य संघटिका यांचे अधिपत्याखाली महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरं ग्राम सोनगिरी, ग्राम परसाळी,ग्राम चिखलगाव, ग्राम राजंदा, ग्राम राहित साहित या गावांमध्ये उपासिका महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली, यामध्ये केन्द्रीय शिक्षिका सिंधुताई शेगावकर, वर्षाताई हिवराळे, करुणाताई साखरकर, वैशालीताई गोटे, वर्षाताई डोंगरे यांनी विविध विषयांवर महिला उपासिका यांना प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर जिल्ह्याचे संरक्षण विभागाचे प्रमुख आद. विजयजी हवराळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेची सर्व कार्यकारणी, तालुक्याची कार्यकारणी, गाव पातळीवरील कार्यकरणी प्रामुख्याने हजर होते. 
या कार्यक्रमाच्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बार्शीटाकळी तालुक्याचे अध्यक्ष आयु. भारत आकोडे, माजी अध्यक्ष आयु. प्रवीण वानखडे , बाळापूर तालुका अध्यक्ष आयु.राहुल इंगळे,आणि त्यांचे सर्व सक्रिय पदाधिकारी, सहकारी मंडळी यांनी तन-मन धनाने सहकार्य करून शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या कष्टाने आणि तत्परतेने प्रयत्न केलेत. कार्यक्रमाचे अतिशय सदाबहार सूत्रसंचालन आयु. प्रवीण वानखडे, माजी तालुकाध्यक्ष बार्शीटाकळी यांनी केले प्रास्ताविक आयु. शशिकांत इंगळे तालुका सरचिटणीस यांनी केले असून आभार आयु. विद्याताई आकोडे यांनी मानले.या कार्यक्रमाला महिलाजिल्हाअध्यक्ष आयु. इंदुताई मेश्राम,प्रज्ञाताई ईंगळे,वैशालीताई वाहुरवाघ,आयु. पंचशील गजघाटे,आयु.विलास बावस्कर, आयु. राहुल गोटे, आयु. रामचंद्र वाकोडे, आयु. आशाताई अहिरे, आयु. एकनाथ वानखडे, आयु. गोरखनाथ वानखडे, आयु. अशोकराव खंडारे, आयु. माणिकराव इंगळे, अजय डोंगरे, तसेच जिल्ह्यातील, तालुका,महानगराचे सर्व भारतीय बौद्ध महासभाचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, समता सैनिक दलाचे संपूर्ण पदाधिकारी तसेच सिंदखेड गावातील निष्ठावंत कार्यकर्ते, उपासक, उपासिका आणि सर्व जाती-धर्माची मंडळी आवर्जून उपस्थित होते असे एका पत्रकाद्वारे जिल्ह्याचे प्रचार प्रसार पर्यटन सचिव संजय गवई यांनी कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,