निहिदा येथे विवाहित महिलेचा विनयभंग : पिंजर पोलिसात गुन्हा दाखल
निहिदा येथे विवाहित महिलेचा विनयभंग : पिंजर पोलिसात गुन्हा दाखल
बार्शिटाकळी : तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे निहीदा येथील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ऋषिकेश दादाराव हागे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे,
प्राप्त माहितीनुसार, निहिदा येथील एका महिलेचा पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने सदर महिला आपल्या दोन मुलासह घरात झोपली असताना ऋषिकेश दादाराव हागे हा २३ फेब्रुवारी रोजीच्या रात्री १ वाजता सदर महिलेच्या घरात घुसला, आणि सदर महिलेचा त्याने विनयभंग केला, अशी तक्रार पिंजर पोलिसात प्राप्त झाली आहे, तेवढ्यात महिलेचे सासरे.... हे जागी झाले असता, त्या दोघांमध्ये झटापट झाली, आणि ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे, यावरून पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दादाराव हागे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे, अशी माहिती पिंजर पोलिसांनी दिली आहे, सदर घटनेचा तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार चंद्रकांत गोरे व यांचे सहकार्य करीत आहेत
Comments
Post a Comment