युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड.....

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड.... 
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
  युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 
युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे. तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली. लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. केतकीताई विशाल पांडे, विभागीय अध्यक्ष श्री विजय सूर्यवंशी , अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....