👉अवैध दारू विक्री, वरली, जुगार जोरात........ 👉पिंपळखुटा सरपंचांसह महिलांची पोलिसात तक्रार... 👉महिला धडकल्या ठाण्यावर!..........
👉अवैध दारू विक्री, वरली, जुगार जोरात........
👉पिंपळखुटा सरपंचांसह महिलांची पोलिसात तक्रार...,..
👉महिला धडकल्या ठाण्यावर!..........
बार्शिटाकळी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ऑपरेशनाप्रहार अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबविली असली तरी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपळखुटा गावात आहेध दारू विक्री, वरली, मटका, जुगारचे धंदे जोरात सुरू आहेत. ते बंद करण्यात यावेत, अशा प्रकारची तक्रार गावच्या महिला सरपंचासह इतर महिलांनी बार्शिटाकळी पोलिसात दिली आहे.
बार्शिटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा गावात १५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास प्रामपंचायत कार्यालयात आदिशक्ती अभियानांतर्गत कोमल मोरे
यांच्या अध्यक्षखाली सभा पार पडली. गावातील दारू, वरली व जुगार बंदीबाबत विशेष सभेचे आयोजन केले होते. यानंतर बार्शिटाकळी पोलिसांकडे सरपंच सोनू गणेश बोबड़े, कोमल मीरे, ग्रामपंचायत सचिव, गीता चव्हाण, कांताबाई मोरे, विमलाबाई शेलार, शोभा निबाळकर, चंदा शेलार, शारदाबाई नलवडे, ताराबाई गायकवाड, स्वाती शेलार, दीपाली मोरे, सोनाली शिंदे, विमल चव्हाण, विमल शेलार, मनीषा चव्हाण, राह शिंदे, संगीता शेलार, पूजा घाड़गे, प्रीती शिंदे रेखा आमनिक अशा अनेक महिला सहभागी होत लकार दिली. बार्शिटाकळी पोलिसात दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई होते, याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे
मुख्य चौकातील खड्डे धोकादायक!
बार्शिटाकळी : अकोला ते बार्शिटाकळी रस्त्यावर बायपास नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुख्य चौकातील रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. रात्रंदिवस प्रवाशांची व जनतेची या मार्गावर वर्दळ असून हे खड्डे वाहतुकीसाठी व जनतेला धोकादायक ठरत आहेत. यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. संबंधित विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेया गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment