वडगाव येथे विमुक्त भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचा लाभ....

वडगाव येथे विमुक्त भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचा लाभ....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- सेवा पंधरवाडा अंतर्गत आज दिनांक 26 /9/ 2025 रोजी ग्रामपंचायत वडगाव येथे उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर श्री .संदीपजी अपार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विमुक्त भटक्या जाती जमाती यांच्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्र, आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, इलेक्शन कार्ड, जात प्रमाणपत्र ,जन्म प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट ,उत्पन्नाचे दाखले व इतर आवश्यक प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले .
सदर शिबिरासाठी श्री. राजेशजी वजीरे तहसीलदार बार्शिटाकळी, संदीपजी बोळे मंडळ अधिकारी खेर्डा बु: , पुरवठा विभागातील लिपिक श्री शेगोकार साहेब, वडगावचे सरपंच श्री शाहीनाथ बाबर, पोलीस पाटील श्री.संजय नीलखन , खेर्डा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, सेतूधारक , राशन दुकानदार, आधार कार्ड केंद्र संचालक व वडगाव गावातील लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सदर शिबिरात एकूण 85 विविध दाखले प्रमाणपत्र तहसीलदार श्री राजेश वझीरे यांच्याहस्ते वितरित करण्यात आले, सदर शिबिरात तहसीलदार श्री राजेश वझीरे यांनी लाभार्थ्याच्या अडी अडचणी समजून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व गावातील लाभार्थी यांनी तहसील कार्यालय बार्शिटाकळी व महसूल विभाग व उपस्थित सर्व टीमचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे