जय जगदंबा मंडळ व न्यूट्रेजेनिक्स यांच्या तर्फे मोफत भव्य दिव्य आरोग्य शिबीर....

जय जगदंबा मंडळ व न्यूट्रेजेनिक्स यांच्या तर्फे मोफत भव्य दिव्य आरोग्य शिबीर....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- संताजी नगर बार्शिटाकळी येथील जगदंबा मंडळ व न्यूट्रेजेनिक्स यांच्या तर्फे मोफत भव्य दिव्य आरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक २८/९/२०२५ रविवारी रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत करण्यात आले असून या शिबिराचा बार्शिटाकळी शहरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संताजी नगर मधील समाज सेवक तथा आरोग्य सेवक नितेश संजय वाघमारे यांनी केले आहे. 
   सदर शिबीरात अकोला येथील तज्ञ हाडाचे सर्जन डॉ. मंदार वाघमारे , जनरल फिजीशन डॉ आशिष चाफे, मुत्रविकार तज्ञ डॉ समित तुळजापुरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ अनुराधा भेंडे-तुळजापुरे , डोळ्याचे सर्जन डॉ पुजा खेतान, मेदु रोग, मानसिक रोग, व व्यसनमुक्ती तज्ञ डॉ प्रणव चरखे, मुळव्याध व पोटाचे विकार तज्ञ डॉ तुषार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 

मुतखडा व किडनी वरील उपचार बि.पी. तपासणे मेंदुरोग व मानसिक आजार निवारण व उपचार

* स्त्रीरोगा वरील उपचार मुळव्याध व अपेंडिक्स पित्ताशय ॲसेडीटी, पोटातील विकार थायराईड

* शरीरातील गाठी डोळ्याचे सर्व आजार, मशिनव्दारे तपासणी

* वाताचा त्रास, जॉईट दुखणे, सांध्याचे व मनक्याचे विकार बि.पी. शुगर, व जनरल रोगा 

 वरील तपासण्या केल्या जातील या शिबिराचा लाभ घेण्यासाठी खालील मोबाईल नंबर वर नाव नोंदणी करावी नाव नोंदणी व अधिक माहिती संपर्क अरविंद भुजाडे मो.8087245471, गजानन गर्दै 9404373866, शुभम राजुरकर 7709425810, विशाल भुजाडे मो.9673565622, राहुल गौर मो.8806239664,रवि भगत मो.9699130829
 वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधुन लवकरात लवकर आपले नोंदवून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक नितेश संजय वाघमारे (समाजसेवक व रुग्णसेवक) मो. 7972448522 यांनी केले आहे 
टिप :- आवश्यकतेच्या नुसार अल्पदरात चश्मे मिळतील.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे