बार्शिटाकळी नगरपंचायतसाठी ७३.०७ टक्के मतदान...
बार्शिटाकळी नगरपंचायतसाठी ७३.०७ टक्के मतदान.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी २८ मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदानाच्या सुरुवातीला सकाळी ११:३० वाजेपर्यंत २६.५३ टक्के, दुपारी १:३० वाजेपर्यंत ४१.८३ टक्के, ३:३० वाजेपर्यंत ५८.०३ टक्के मतदान झाले.
नगरपंचायतकरिता झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी अंतिम मतदान ७३.०७ टक्के झाले. यामध्ये ७९७८ पुरुष व ७३२७ महिला अशा एकूण १५३०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अपर पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा
मतदान प्रक्रियेदरम्यान अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी शहरातील काही मतदान केंद्रांवर जाऊन निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.
डमी मतपत्रिका फलकावर न लावल्याने तक्रार
येथील नगरपंचायत निवडणुकीतील मतदान केंद्र क्रमांक १० च्या बाहेर दर्शनी भागात फलकावर प्रोसिडिंग अधिकाऱ्याने डमी मतपत्रिका न लावल्याने मतदारांची तारांबळ उडाली. याबाबत अतुल गणेश गोल्डे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.
आधी मतदानाचे टेन्शन, आता निकालाची प्रतीक्षा
नगरपंचायतीच्या निवडणूक रिंगणात असलेले नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना मतदान होईपर्यंत टेन्शनच होते. परंतु आता मतमोजणी व निकालाची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे लांबणीवर पडल्याने २१ डिसेंबर पर्यंत निकालासाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Comments
Post a Comment