गोर सीकवाडी तर्फे तालुकास्तरीय 'नायकीर सोगण' हजारो बांधवांनी घेतली नायकीची शपथ....
गोर सीकवाडीतर्फे तालुकास्तरीय 'नायकीर सोगण' हजारो बांधवांनी घेतली नायकीची शपथ...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- गोर सीकवाडी गोर सेनेतर्फे तालुकास्तरीय रेडवा तांड्यांमध्ये 'नायकीर सोगण' कार्यक्रम आयोजित हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नायक यांनी आज ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. हा दिवस गोर बंजारा समाजासाठी स्वाभिमानाचा दिवस. हेच लक्षात घेऊन रेडवा येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिवन जाधव. स ज पा .सर्कल अध्यक्ष यांनी सूत्रसंचालन केले व प्रस्तावना साजन राठोड साहित्य दळ तालुका अध्यक्ष यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोहर राठोड गोर सेना विदर्भ अध्यक्ष, अतिश राठोड समनक जनता पार्टी तालुका अध्यक्ष, सेवक राठोड गोर सेना कट्टर सोबती यांनी मार्गदर्शन केलं.
सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील नायक नायकण, कारभारी कारभारीन, गोर गावंळीयां,आई बहीनी आप आपल्या टिम सह गोर बंजारा संस्कृती, वहीवाट, अन् वसंतराव नायक यांचे गित गायनातून नृत्य सादर कार्यक्रमाची सोभा वाढवली.
महाराष्ट्र राज्याचे वसंतराव नायक मुख्यमंत्री ११ वर्ष,२ महिने,१६ दिवस मुख्यमंत्री पद भूषविले व सर्व समाजातील जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवून राज्याचा धुरा सांभाळला. त्यासाठी पुण्यामध्ये शनिवार वाड्यात बोलत असतांना दोन वर्षात अन्नधान्य परिपूर्ण न केल्यास मी या शनिवार वाड्यात फासावर चढले.
सदर कार्यक्रम गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन् गोर सीकवाडी तालुका संयोजक विकास जाधव, रेडवा तांड्यातील नायक उदेसिंग राठोड, कारभारी प्रकाश जाधव, मारखेडी डायेसांळे ता अध्यक्ष मधुकर राठोड, उपाध्यक्ष अनिल जाधव, राहुल राठोड कमांडो ता अध्यक्ष, धरमळी ता अध्यक्ष संगीता चव्हाण, दादाराव पवार पं सं सदस्य , दगडपारवा गोटू महाराज, रितेश चव्हाण व रेडवा तांडा गोर सेना, मंडळ युवा, पदाधिकारी गोर बंजारा बांधव उपस्थित राहुन कार्यक्रम पार पाडण्यात आले
Comments
Post a Comment