बार्शिटाकळी शेतकरी एल्गार समितीचे बार्शिटाकळी सहाय्यक निबंधक यांना निवेदन....... 👉नाफेडवर सोयाबीन, कपाशी खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी....
बार्शिटाकळी शेतकरी एल्गार समितीचे बार्शिटाकळी सहाय्यक निबंधक यांना निवेदन......
👉नाफेडवर सोयाबीन, कपाशी खरेदी करताना शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- नाफेडवर सोयाबीन व कपाशी खरेदी करताना त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हाताच्या बोटाचे उसे घ्यावे, किंवा फिंगर प्रिंट घेण्यात यावी, आणि दुष्काळी मधून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असे निवेदन बार्शिटाकळी तालुका एल्गार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, सहाय्यक निबंधक, इत्यादी ना १५ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील एल्गार समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते,
बार्शिटाकळी तालुका एल्गार समितीने दिलेल्यादिलेल्या निवेदनातून म्हटले की, नाफेडवर शेतकऱ्यांनी सोयाबीन किंवा कपाशी दिल्यास, त्या संबंधित शेतकऱ्यांच्या हाताचे बोटाचे ठसे घ्यावे, किंवा त्यांच्या हाताची फिंगरप्रिंट काढावी, तसेच दुष्काळी मध्ये वंचित असलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा त्वरित आर्थिक लाभ मिळावा, यासाठी १५ डिसेंबर २०२५ रोजी बार्शिटाकळी तालुका एल्गार समितीच्या वतीने किरण पाटील ठाकरे, महादेव गावंडे, जनार्दन ठोकळ, गणेश ताठे, प्रल्हाद माळकर, अनिल आंबेकर, मनोहर कमानदार, सुरेश वानखडे, सचिन कडू, ज्ञानेश्वर तवाडे, अक्षय वकटे, ज्ञानेश्वर ढोरे, गोपाल पवार, सुभाष राठोड, अविनाश ठाकरे, मंगेश अंधारे, भारत पाटील चांभारे, इत्यादी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने एल्गार समितीने संबंधितांना १५ डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे, वास्तविकता, शेतकरी यलगार समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करीत असते, अनेकदा आंदोलन मोर्चे, निवेदने, रास्ता रोको, त्यांनी केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी आज ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे,
Comments
Post a Comment