बार्शिटाकळी नगर परिषद मतमोजणी साठी पोलीस विभाग सज्ज...... 👉शहरातून काढला रूट मार्च

बार्शिटाकळी नगर परिषद मतमोजणी साठी पोलीस विभाग सज्ज......
👉शहरातून काढला रूट मार्च....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर पंचायत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यावेळी बार्शिटाकळी पोलिसांनी पोलीस ठाण्यापासून रूट मार्च सुरू झाला आणि आठवडी बाजार, रमेश नगर, ढोरे वेटाळ, अशोक नगर, माळीपुरा, काळा मारोती, जामा मज्जीद चौक, शिवाजी चौक, बाजार लाईन, नगरपचायत चौक, तेलीपुरा, अकोली वेस आणि जुने बस स्टँडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन केले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस वाहने, आणि पायी पथकांनी संपूर्ण शहरात सुरक्षेचा संदेश दिला.
 विभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चचे नेतृत्व बार्शिटाकळी पोलीस निरीक्षक प्रविण धुमाळ आणि पीएसआय चाटे यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस विभागातील वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रूट मार्चमध्ये आरसीपी पथक, पोलीस विभाग, होमगार्ड, वाहतूक पोलिस विभाग सहभागी होते. रूट मार्चद्वारे, पोलिस प्रशासनाने जनतेला स्पष्ट संदेश दिला की मतमोजणी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे, शांततेत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी कोणत्याही अफवा, गोंधळ किंवा कोणत्याही समाजविघातक कृत्यांपासून दूर राहण्याचे आणि अशा कृत्यांबद्दल त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले. (ता.प्र.)

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....