राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा आयोजन............

राज्यस्तरीय युवक युवती परिचय मेळावा आयोजन...........

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :-  माळी समाजसेवा बहुउद्देशीय मंडळ खडकी अकोला अंतर्गत दिनांक २८ डिसेंबर २०२५ रविवारी पुंडलिक नगर खडकी अकोला येथे संस्थापक अध्यक्ष डॉ. वामनराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली युवक युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात येत आहे सर्वप्रथम उद्घाटन प्रसंगी परिणय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येईल पुस्तिकेमध्ये युवक 843 युवती 538 एकूण 1381 युवक युवतींची नोंदणी झालेली आहे या सर्व युवक युवतींना व्यासपीठा वरून स्वतःचा परिचय करण्याची संधी प्राप्त करून त्यांना योग्य जोडीदाराची निवड करता यावी याकरिता गेल्या 26 वर्षापासून हा उपक्रम राबविल्या जात आहे नुकत्याच नगरपरिषद नगरपंचायत मध्ये निवडून आलेले नगराध्यक्ष नगरसेवक यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केल्या जाईल करिता माळी समाजामधून निवडून आलेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला २८ डिसेंबर २०२५ रोजी ठीक सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे ही विनंती या मेळाव्याच्या माध्यमातून बऱ्याचश्या युवक. युवतीचे दरवर्षी संबंध जुळून येत आहे आणि काळाच्या गरजेनुसार दरवर्षी मेळाव्या मध्ये युवक युवती पालक यांची उपस्थिती वाढत आहे सर्व माळी समाज बांधवांना विनंती आपण मेळाव्याला उपस्थित राहून मेळाव्याच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणीत कराल अशा प्रकारचे आव्हान मेळावा अध्यक्ष सुभाष भवाने, कार्याध्यक्ष सुरेंद्र आरेकर ,कोषाध्यक्ष भगवंत बोचरे ,सचिव संदीप खडके, सहसचिव संदीप गिरे यांनी केले आहे 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....