होमगार्ड नागेश ठाकरे यांचा असाही प्रामाणिकपणा..... 👉1 लाख रूपयाचा मोबाईल केला परत.....

होमगार्ड नागेश ठाकरे यांचा असाही प्रामाणिकपणा..... 
👉1 लाख रूपयाचा मोबाईल केला परत.
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी :- महानगरपालिका बंदोबस्त साठी खदान पोलीस स्टेशनला ड्युटी वर असणारे सैनिक नागेश ठाकरे सनद क्र. 460 व सैनिक विकास राठोड 1579 व सैनिक राजेश ढवळे 421 व दोन नागपूर येथील महिला कॉनस्टेबल प्रशिक्षणनार्थी हे विजयी उमेदवार यांचा रॅली सोबत ड्युटी वर होते राजेश हार्डवेअर समोर सिंधी कॅम्प खदान अकोला या ठिकाणी रॅली मध्ये युसूफ अली या मुलाचा मोबाईल पडला असता तो मोबाईल बार्शिटाकळी येथील सैनिक नागेश ठाकरे यांना रस्त्यावर खाली पडलेला दिसला त्यांनी तो जवळ घेतला, व काही वेळाने मोबाईल वर फोन आला असता त्यानी त्याला ओळखिचे पुरावे घेऊन बोलावले व तो आला असता त्याची शहानिशा करून मोबाईल त्याच्या स्वाधीन केला आपला मोबाईल पाहून त्यांनी अकोला होमगार्ड चे विशेष आभार मानले व तुमच्या सारखे इमानदार होमगार्ड सैनिक आहेत म्हणून आम्ही आहोत असे उदगार काढले या साठी सैनिक नागेश ठाकरे यांचे व सोबतच्या सर्वांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे, आपण ज्या निष्काम सेवा करणारी होमगार्ड संघटना आहे त्याचे सदस्य आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असे नागेश ठाकरे यांनी आमच्या शी बोलतांना म्हणतं होते,

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,