आकोट शहरातील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या अन्यथा लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थ्यांसह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा......
आकोट शहरातील अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या अन्यथा लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थ्यांसह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा......
प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- बऱ्याच वर्षापासुन आकोट शहर मध्ये अधुरे राहिलेले अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल द्या नाहीतर आंदोलन करू वंचित चे लखन इंगळे यांचा 26 जानेवारी ला अतिक्रमण लाभार्थी सह न.प.आकोट येथे आंदोलनाचा इशारा
आकोट शहर मधील गोरगरीब व सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमी सक्रिय असलेले वंचित बहुजन आघाडी चे व आकोट तालुका अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ आकोट चे लखन इंगळे यांनी आकोट शहर मधील सर्व जाती धर्माचे लोकं राहतात अस्या अतिक्रमण जागा नियमानुकूल करून त्या जागेचे पट्टे बहाल करून त्या जागी घरकुल चा लाभ देण्यासाठी वंचित चे लखन इंगळे यांनी शासन निर्णय 2018 निघाला त्या वर्षा पासुन तर लगातार आज परियंत विविध प्रकारे निवेदन अकोला जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आकोट नगर परिषद तत्कालीन मुख्यअधिकारी वाहूरवाघ साहेब यांना देऊन कार्यालयात आंदोलन करून मोर्चे काढून त्याचा पाठपुरावा केला याची दखल संबंधित अधीकारी यांनी घेतली व आकोट शहर मध्ये अतिक्रमण धारक यांच्या फाईल जमा करून काही वार्डात ड्रोन द्वारे अतिक्रमण जागेचे सर्वे करून त्या जागेचे सर्व नकाशे नजूल शीट तयार केले त्यामध्ये न.प.आकोट यांनी नेमलेल्या एजेंशीकडे रुपये 86000 रुपयाची नजूल मोजणीचे चलान न.प.आकोट यांनी भरल्यामुळे अधुरे राहिलेले काम हे अजुन बाकी असुन करीता अतिक्रमण जागेचे पट्टे बहाल करण्यात यावे यां संदर्भात दि. 26 जानेवारी 2026 रोजी अतिक्रमण लाभार्थी यांना सोबत घेऊन नगर परिषद कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे आकोट नगर परिषद मुख्यअधिकारी मार्फत उपमुख्यअधिकारी व आकोट नगराअध्यक्ष मायाताई धुळे निवेदन देऊन अतिक्रमण बाबत चा ठराव घेऊन याबद्दल चर्चा केली निवेदन सादर केले निवेदन देते वेळी चेतन तेलगोटे, प्रतीक तेलगोटे, योगेश दवंडे , सुगत तेलगोटे , भारत वाघमारे, नवनीत तेलगोटे, सुगत तेलगोटे, सुरज तेलगोटे, अर्पण आठवले, श्याम दवंडे, यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment