बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार! 👉राजकीय घडामोडीला वेग!

बार्शिटाकळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार!
👉राजकीय घडामोडीला वेग!
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी नगरपंचायतच्या उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाकरीता राजकीय घडामोडीला वेग आला असून, कोणाला कोणते पद मिळणार यापेक्षा सदर निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बार्शिटाकळी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली. नगराध्यक्ष पदावर वंचित बहुजन आघाडीच्याच्या अख्तरखातून अलीमोद्दीन यांची तर नगरसेवक पदावर वंचित बहुजन आघाडीचे शेख साबीर शेख अमीन, सै. अबरार सै. मीर, मो. जफर मो.हाशम, राष्ट्रीय काँग्रेस मधून मुमताजबी मो. सिद्दीक, रफिया खातून अन्सार उल्लाह खान,  अजगरी अंजुम सय्यद असद अली, भारतीय जनता पार्टी मधून रमेश मनोहर वाटमारे, आरती अनंत केदारे, सविताताई शंकर वरगट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून मोहम्मद रुबीना परवीन रिजवान, मोहम्मद सफिया बेगम रफिक, एम आय एम मधून मोहम्मद फरहान शेख जमील असे विविध पक्षाचे तर अपक्ष शुभम मोहन इंगळे, इफ्ते खारोद्दिन काजीसईदोद्दीन, नवेद अहमद खान जहागीर खान, शहाणा अंजुम सय्यदअजहर हुसेन, आम्रपाली नागसेन इंगोले असे नगरसेवक निवडून आले आहेत.

२ जानेवारी २०२६ पर्यंत गटाचे सदस्य यांचे माहिती जिल्हाधिकारी यांना देणे आवश्यक असून, दिनांक १३ जानेवारी २०२६ ला प्रथम सभा होत असून सदर सभेत उपाध्यक्षाची निवड तसेच स्वीकृत सदस्य तसेच उपाध्यक्ष यांच्याकडे कोणत्या समित्या देण्यात येतील या व इतर महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात सभेत चर्चा होत आहे. सदर सभेचे पीठाशीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष व सचिव म्हणून मुख्याधिकारी राहुल कंकाळ काम पाहतील. उपाध्यक्ष पदाचा नामनिर्देशन अर्ज दाखल दिनांक १२ जानेवारी आहे. विशेष म्हणजे उपाध्यक्ष पदाच्या व स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षाला मतदान करण्याचा अधिकार असल्याने अठरा सदस्यांमधून कोण कशा पद्धतीने बहुमताचा आकडा पार पाडू शकेल. हा महत्त्वाचा विषय ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....